Kangana Ranaut Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Kangana Ranaut: "फक्त कंगना रणौतला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमत आहे. ती किती सुंदर परी दिसते आहे, ती काय आहे हे लोकांना बघायचे आहे. ही गर्दी मतांमध्ये बदलणार नाही."

सकाळ वृत्तसेवा

Created By: Boom

Translated By : Sakal Digital Team

बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रणौतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

यात ती म्हणतेय की, गर्दी फक्त कंगनाला बघायला येते, मात्र ही गर्दी तिला मतदान करणार नाही.

या दाव्यानंतर बूमला त्याच्या तपासणीत असे आढळून आले की, हा व्हायरल व्हिडिओ अपूर्ण आहे.

मूळ व्हिडिओमध्ये, कंगना हिमाचल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि मंडीच्या विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांच्यावर प्रहार करत होती. एक दिवसापूर्वी प्रतिभा सिंह कंगना रणौतवर चीका करताना म्हणाल्या होत्या, "तिला पाहण्यासाठी गर्दी जमत आहे. या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार नाही."

दावा

व्हायरल व्हिडीओमध्ये कंगना म्हणतेय, "कंगनाला बघायला आलेली ही गर्दी मतदान करणार नाही. ते फक्त बघायला येतात की कंगना काय चीज आहे आणि मुंबईने आलेली कंगनना किती सुंदर आहे हे लोकांना पाहायचे असते."

व्हिडिओ शेअर करताना एका फेसबुक यूजरने लिहिले की, 'कंगनाने पराभव स्वीकारला आहे. लोक मतदान करणार नाहीत, ते फक्त तिला पाहण्यासाठी येतात.'

'फेसबुक'वरील (Facebook) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

भाजप उमेदवार कंगनाबाबत केला जाणारा दावा.

सत्य

व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी BOOM ने व्हिडिओशी संबंधित कीवर्डसह Google वर शोध घेतला. त्यावेळी त्यांना 2 मे 2024 रोजी प्रकाशित झालेल्या पंजाब केसरीवरील बातमी सापडली.

या बातमीचे शीर्षक होते, 'कंगनाची कारसोगमध्ये विक्रमादित्य आणि प्रतिभा सिंह यांच्याविरोधात फटकेबाजी, "मी मुंबईची सौंदर्य परी नाही."

या बातमीमध्ये संपूर्ण व्हिडिओचा देखील समावेश आहे. व्हायरल व्हिडिओचा भाग 10 सेकंदांनंतर ऐकला जाऊ शकतो. वास्तविक, व्हिडिओमध्ये कंगना प्रतिभा सिंह यांच्या टीकेवर तिची प्रतिक्रिया देत होती.

कंगनाबाबत केल्या जाणाऱ्या दाव्याची संपूर्ण बातमी.

यानंतर आम्ही आणखी मीडिया रिपोर्ट्स शोधले. ईटीव्ही हिमाचल प्रदेश आणि दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, नवीधर, कारसोग येथे झालेल्या एका जाहीर सभेत भाजप उमेदवार कंगना राणौत यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले, "आई आणि मुलगा दोघांनाही मुलींचा आदर कसा करावा हे माहित नाही. शेहजादे (मुलगा विक्रमादित्य) तो करू शकतो. पत्नीचा आदर न करता तिच्यावर अत्याचार केला आणि आई प्रतिभा सिंह सांगतात की, लोक मुंबईहून आलेली वस्तू बघायला येत आहेत आणि तिला मतदान करणार नाहीत.

खरं तर, 1 मे 2024 रोजी प्रतिभा सिंह म्हणाल्या होत्या, "फक्त कंगना रणौतला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमत आहे. ती किती सुंदर परी दिसते आहे, ती काय आहे हे लोकांना बघायचे आहे. ही गर्दी मतांमध्ये बदलणार नाही."

निष्कर्ष

सोशल मीडियावर कंगनाबाबत व्हायरल होत असलेला व्हिडिओ अर्धवट आणि अर्ध सत्य असल्याचे बूमने केलेल्या फॅक्टचेकमधून स्पष्ट झाले आहे.

'बूम' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT