Duplicate Fingers Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

Loksabha Election 2024: "या बोटांकडे पाहिल्यावर ती खरी आहेत की खोटी हे तुम्ही ओळखूही शकणार नाही. बोटांवर शाई लावून मतदान करणाऱ्यांना फसवता येते. बघा देशात काय चाललेयय"

सकाळ वृत्तसेवा

Created By: News Checker

Translated By : Sakal Digital Team

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावर कृत्रिम बोटांचा एक फोटो व्हायरल होत आहे. फोटो शेअर करून असा दावा केला जात आहे की, बंगालमध्ये बोगस मतदानासाठी बनावट बोटांचा वापर केला जात आहे.

दावा

बंगालमध्ये एकापेक्षा जास्त बनावट मतदान करण्यासाठी बनावट बोटे वाटली जात आहेत.

'एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Duplicate Fingers

सत्य

या दाव्यामागील सत्य तपासण्यासाठी, दाव्यासोबत शेअर केलेल्या चित्रात लिहिलेल्या बंगाली मजकुराचे न्यूजचेकरने हिंदीत भाषांतर केले. या फोटोवर बंगालीमध्ये लिहिले आहे की, “मतांची हेराफेरी करण्यासाठी नकली बोटे बनवली जात आहेत. ही नकली बोटे बोगस मते टाकण्यासाठी बनावट तयार केली जात आहेत. या बोटांकडे पाहिल्यावर ती खरी आहेत की खोटी हे तुम्ही ओळखूही शकणार नाही. बोटांवर शाई लावून मतदान करणाऱ्यांना फसवता येते. बघा देशात काय चाललेयय"

दावा केलेला व्हायरल फोटो रिव्हर्स इमेज सर्च वर अपलोड केला. संबंधित कीवर्ड ‘Akiko fujita’, ‘Prosthetic fingers’ गुगल सर्च वर शोधताना, न्यू जपानच्या 'एबीसी न्यूज'ने 6 जून 2013 रोजी प्रकाशित केलेला अहवाल सापडला.

या अहवालात व्हायरल फोटोसारखाच एक फोटोही शेअर करण्यात आला होता, ज्याचे क्रेडिट 'Akikofujita.com'ला देण्यात आले होते.

संबंधित कीवर्ड शोधताना, न्यूजचेकरला जपानच्या 'एबीसी न्यूज'ने जपानमधील 'याकुझा' या गुन्हेगारी टोळीतील सदस्यांकडून कृत्रिम बोटे बनवण्याच्या ऑर्डर्स जपानी प्रोस्थेटिक्स निर्माता 'शिंतारो हयाशी'ला मिळाल्याची बातमी होती.

'याकुझा' गटातील "युबिटसुम" नावाच्या विधी दरम्यान, याकुझाच्या सदस्यांना गंभीर गुन्ह्यांचे प्रायश्चित्त करण्यासाठी स्वतःचे हातपाय कापावे लागतात. पण नंतर बाहेर आल्यावर त्या तोडलेल्या बोटांमुळे त्यांना काम मिळवण्यात अडचण येते. त्यामुळे तोडलेली बोटे लपविण्यासाठी 'शिंतारो हयाशी'ने ही बनावट बोटे बनवली होती.

निष्कर्ष

अशाप्रकारे, बंगालमध्ये एकापेक्षा जास्त मते देण्यासाठी बनावट बोटे वाटल्याचा दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.

'न्यूजचेकर' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : लालबाग राजाची मिरवणूक २२ तासांनी गिरगाव चौपाटीवर

Chh. Sambhajinagar: गणेश विसर्जनावेळी जीवघेणा प्रसंग; गणेश भक्ताला जीवनरक्षक दलाने दिले वेळेवर जीवनदान

मुंबईत गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन, अनंत अंबानीही उपस्थित

Village Road Dispute : पाणंद रस्त्यावरून होणाऱ्या वादावर प्रशासनाचे महत्वाचे पाऊल, रस्त्यांचे 'बारसं' घालून अतिक्रमण निघणार

SCROLL FOR NEXT