Ratan Tata Along With His Pet Dog Goa Esakal
व्हायरल-सत्य

Ratan Tata Dog Goa: रतन टाटा यांच्या निधनानंतर 3 दिवसांनी त्यांचे कुत्रे 'गोवा'चा देखील मृत्यू? व्हायरल पोस्टवर काय म्हणाले पोलीस?

Fact Check Ratan Tata Dog Goa Death: व्हायरल होत असलेल्या मेसेजमधील रतन टाटा यांचा कुत्रा 'गोवा'च्या मृत्यूची बातमी खरी आहे का? यावर मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने उत्तर दिले आहे.

आशुतोष मसगौंडे

उद्योगपती रतन टाटा यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. याानंतर त्यांच्या 'गोवा' नावाच्या कुत्र्याची देशभरात चर्चा होत आहे. अशात आता सोशल मीडियावर एक व्हॉट्सॲप मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये रतन टाटा यांच्या निधनाच्या ३ दिवसांनी त्यांचा कुत्रा 'गोवा'चाही मृत्यू झाल्याचे लिहिले आहे.

दरम्यान व्हायरल होत असलेल्या मेसेजमधील रतन टाटा यांचा कुत्रा 'गोवा'च्या मृत्यूची बातमी खरी आहे का? यावर मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने उत्तर दिले आहे.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

व्हॉट्सॲपवर व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये म्हटले आहे की, "रतन टाटा यांच्या 'गोवा' नावाच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. ही दु:खद बातमी आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर 3 दिवसांनी 'गोवा' या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला आहे."

मुंबई पोलीस अधिकाऱ्याने काय सांगितले?

मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रतन टाटा यांचा पाळीव कुत्रा 'गोवा' याच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हॉट्सॲप मेसेज खोटा आहे. रतन टाटा यांचा कुत्रा 'गोवा' जिवंत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

'गोवा'च्या मृत्यूबाबत व्हायरल झालेली पोस्ट खोटी : सुधीर कुडाळकर

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर म्हणाले की, "जेव्हा व्हायरल पोस्ट त्यांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी रतन टाटा यांचे जवळचे असलेल्या शंतनू नायडू यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा शंंतनू नायडू यांनी सांगितले की, 'गोवा' ठीक आहे.

यानंतर पोलीस निरीक्षक कुडाळकर यांनी शंतनू नायडू यांच्या हवाल्याने 'गोवा' जिवंत असल्याचे सांगितले. यावेळी कुडाळकर यांनी लोकांना खोट्या माहितीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सोशल मीडिया युजर्सना अफवा आणि चुकीच्या माहितीला बळी पडू नका असा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT