Fake News Virat Kohli Father Death Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: भारत-पाकिस्तान मॅच सुरू असताना विराटच्या वडिलांचे निधन झाल्याचा दावा खोटा, व्हायरल होतोय चुकीचा व्हिडिओ

Virat Kohli: सध्या जगभरात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषकाची सर्वत्र चर्चा आहे. अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आशुतोष मसगौंडे

सध्या जगभारात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषकाची सर्वत्र चर्चा आहे. अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, भारत-पाकिस्तानचा सामना सुरू असताना विराट कोहलीच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर रोहित शर्माने दोन्ही संघाच्या खेळाडूंना एक मिनिटासाठी स्तभ राहत विराटच्या वडिलांसाठी श्रद्धांजली वाहण्यास सांगितली.

दरम्यान ई-सकाळने या व्हिडोओमागील सत्य तपासल्यानंतर तो दिशाभूल करणारा असल्याचे आढळले.

काय आहे दावा?

इन्स्टाग्रामवर एका युजरने भारत-पाकिस्तान सामन्यातील काही भागाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी त्याने लिहिले आहे की, "क्रिकेट खेळत असताना विराट कोहलीच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर रोहित शर्माने सर्वांना एक मिनिटासाठी शोक व्यक्त करण्यास सांगितले. यावेळी विराटला काय वाटले असेल? त्याला वडिलांच्या निधनानंतर घरीही जाता आले नाही. त्याच्यासाठी देश प्रथम आहे."

'इन्स्टाग्राम'वरील (Instagram) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

सत्य

इन्स्टाग्रावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची माहिती घेतल्यानंतर आम्हाला ई-सकाळच्या अर्काईव्हमध्ये ई-सकाळवर 25 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी सापडली. त्यामध्ये असे म्हटले आहे की, "वंशभेदाच्या विरोधात सुरू असलेल्या 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर्स' या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू एका गुडघ्यावर बसलेले दिसले तर पाकिस्तानच्या खेळाडुंनी छातीवर हात ठेवला होता."

ई-सकाळमधील बातमी इथे वाचता येईल-

भारताने गुडघे टेकून तर पाकिस्तानने छातीवर हात ठेवून काय संदेश दिला?

ई-सकाळवर 25 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी.

यावेळी युट्युबवर आम्हाला 'आजतक'चा एक व्हिडिओही सापडला. त्यामध्ये 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर्स' ही मोहिम आणि भारतीय खेळाडू दोन मिनिटांसाठी का गुडघ्यावर बसले याबद्दल सांगण्यात आले आहे.

दरम्यान तीन वर्षापूर्वी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या अश्वेत व्यक्तीचा पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर जगभरात ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर मोहिम सुरु झाली होती. 

विराटच्या वडिलांच्या निधनाचे सत्य

दरम्यान या व्हायरल व्हिडिओमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरू असताना विराट कोहलीच्या वडिलांचे निधन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, तो दावाही खोटा आहे.

कारण विराटच्या वडिलांंचे निधन 2007 मध्ये झाले होते. त्यावेळी विराट रणजी चषक स्पर्धेत कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात दिल्लीकडून खेळत होता.

दरम्यान आम्हाला एक्सवर एक पोस्ट सापडली. त्यामध्ये विराटच्या वडिलांच्या मृत्यूबाबतची बातमी आहे. त्यात एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, "2007 च्या एका बातमीचे दुर्मिळ फुटेज. दिल्लीत विराट कोहली नावाच्या मुलाने आपल्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही फिरोजशाह कोटला मैदानावर फलंदाजी केली, त्यामुळे दिल्लीला हा सामना अनिर्णित राखण्यात यश आले. त्याने 50 धावा केल्या, हे सांगण्याची गरज नाही की हा तरुण भारतीय इतिहासातील सर्वात प्रिय क्रिकेटर बनेल."

निष्कर्ष

ई-सकाळने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर आढळलले की, संबंधीत व्हिडिओतून दिशाभूल करणारा दावा करण्यात आला आहे. काणर त्या व्हि़डिओतील दृष्ये 2021 च्या टी20 विश्वचषकातील आहेत. तर विराटच्या वडिलांचे निधन 2007 मध्ये झाले होते.

'शक्ति कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'सकाळ'ने याचे फॅक्ट चेक केले केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार! बीएमसी साडेचार किमीचा नवा उड्डाणपूल बांधणार, वाचा संपूर्ण मेगाप्लॅन

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध का झाला पराभव? उपकर्णधार रिषभ पंतने सांगितली टीम इंडियाची चूक

Viral Yoga Video : छतावर योगा करत होती तरुणी, माकडाने केली हुबेहुब नक्कल; व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केली प्रशंसा

हृदयद्रावक! 'पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नीनेही सोडले प्राण'; ८० वर्षे एकत्र संसार, करमाळा तालुक्यातील घटना..

Viral Video : सर्जरीनंतर अभिनेत्रीने दाखवते 825 ग्रॅमचे सिलिकॉन ब्रेस्ट, नवीन लुकवर नेटकरी म्हणाले, ‘हे तर पूर्ण बदललंय’

SCROLL FOR NEXT