Aamir Khan's Fake Video Goes Viral  Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: लोकसभा निवडणुकीत अभिनेता आमिर खान काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा व्हिडिओ खोटा

Aamir Khan: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत एक व्हिडोओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता आमिर खान काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आशुतोष मसगौंडे

सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. यामध्ये देशभरातील विविध पक्ष आणि आघाड्या सत्ता मिळवण्यासाठी जोर लावात आहेत.

देशात एकून सात टप्प्यात निवडणुका होत असून, याची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत एक व्हिडोओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता आमिर खान काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यात तथ्य आहे का हे जाणून घेऊया...

दावा

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने आमिर खानचा एक व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे, की आमिर खानने काँग्रेसची जाहीरात केली आहे.

पोस्ट करताना या युजरने लिहिले आहे की, "आता आमिर खानचे सर्व चित्रपट फ्लॉप होणार कारण आमिर खानने काँग्रेसची जाहिरात केली आहे. हाथ बदलेगा हालात … VOTE FOR न्याय VOTE FOR कांग्रेस."

'एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Fake Claim About Aamirk Khan

सत्य

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या दाव्यावाबत सत्य तपासल्यानंतर आम्हाला आढळले की, आमिर खानच्या या व्हिडिओशी छेडछाड करण्यात आली आहे.

कारण रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा मूळ व्हिडिओ आम्हाला सापडला. युट्युबवर सत्यमेव जयते या अकाउंटवरुन 30 ऑगस्ट 2016 रोजी हा व्हिडिओ पहिल्यांदा पोस्ट करण्यात आला होता.

त्यामध्ये आमिर खान त्याच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाची जाहिरात करत होता.

दरम्यान, मूळ व्हिडिओमध्ये आमिर खानने केलेल्या हावभावांवरुन व्हायरल व्हिडिओमध्ये काँग्रेसचा पुरस्कार करणारी वाक्ये टाकण्यात आली आहेत.

आमिर खानचे स्पष्टीकरण

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमिर खानच्या टीमने मंगळवारी अधिकृत निवेदन जारी केले आहे.

आमिर खानच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, आमिर खान यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन किंवा प्रचार केला नाही. त्यांनी मागील अनेक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाच्या जनजागृती मोहिमेद्वारे जनजागृती केली आहे.''

निष्कर्ष:

या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अभिनेता आमिर खानने दिलेले स्पष्टीकरण आणि आम्ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या पुरावांची सत्यता तपासल्यानंतर हे, स्पष्ट झाले की, आमिरने काँग्रेस पक्षाची जाहिरात केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT