Grandmother Hen  esakal
व्हायरल-सत्य

Grandmother Hen : तूम्ही पाहिलीत का जगातल्या सगळ्या कोंबड्यांची आजी ?

या आजीच्या कुटुंबात अनेक सदस्य आहेत

सकाळ डिजिटल टीम

जगातील प्रत्येक मनुष्याचे आयुष्य किती आहे हे ठरलेले असते. मनुष्य त्या वयापर्यंतच जगू शकतात. त्याचप्रमाणे प्राण्यांचेही असते. पण, याला अपवाद ठरलेली एक कोंबडी सध्या सोशल मिडीयावर जागत आहे. कोंबडीच्या वयाबद्दल असे म्हटले जाते की त्यांचे आयुष्य सुमारे 5 वर्षे असते. त्यानुसार 10 वर्षे वयाची कोंबडी वृद्ध मानली जाते.पण, एका कोंबडीवर देवाची एवढी कृपा झाली आहे की ती दिर्घायुषी बनली आहे.  

अमेरिकेतील मिशिगन येथील पीनट नावाची ही कोंबडी अधिक वयाची आहे. तिचे सध्याचे वय 20 वर्षे 304 दिवस आहे. या वयामुळे या कोंबडीचे नाव नुकतेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. तिला 'जगातील सर्वात जुनी कोंबडी' ही पदवी देण्यात आली आहे.

अमेरिकेत असलेली ही कोंबडी बॅंटम जातीची आहे. कोंबड्यांच्या या जाती आकाराच्या बाबतीत इतर जातींपेक्षा किंचित लहान असल्या तरी इतर बाबतीत सारख्याच असतात. प्राण्यांच्या डॉक्टर ज्युलिया पार्कर यांनी पिनटचे वय अधिक असल्याचे स्पष्ट केले. कारण, त्या पहिल्यांदा 2003 मध्ये पिनटला भेटला होता.

याआधी 1989 मध्ये जन्मलेल्या मफी या कोंबडीला सर्वात वयस्कर कोंबडीचा किताब मिळाला होता. मफी 23 वर्षे 152 दिवस जगली होती. 2012 मध्ये तिचा मृत्यू झाला. ती रेड क्विल मफ्ड अमेरिकन जातीची होती.

गिनीज बुकच्या म्हणण्यानुसार,पिनटचा जन्म होण्याआधीच आईने तिला सोडून दिले होते. त्यानंतर मार्सी डार्विन यांनी तिचे संगोपन केले. दोन वर्षांपासून पिनट मार्सीच्या स्वयंपाकघरात पोपटाच्या पिंजऱ्यात राहत होती.

मार्सीने याविषयी सांगितले की, पिनट इतर कोंबड्यांच्या तुलनेत 1-2 जास्त अंडी देते. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत ती अंडी घालत राहिली. तिने आयुष्यात अनेक पिले जन्माला घातली आहेत. तर तिची अनेक नातवंडे आहेत.

कोंबड्यांची आजी

पिनटचे पालन करणाऱ्या मार्सीने तिच्याबद्दल सांगितले की, प्रजननाच्या बाबतीत ती आता वयस्कर झाली आहे. पण जेव्हा ती तरूण होती तेव्हा तिचा सर्वात चांगला मित्र लान्स नावाचा कोंबडा होता. गेल्या काही वर्षांपासून बेनी नावाचा कोंबडा पिनटची काळजी घेत आहे.त्यांच्यातील प्रेम काळजी सर्वकाही मी पाहतो. मला त्यांचा खूप हेवा वाटतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: धक्कादायक! आपच्या बड्या नेत्यावर बेछूट गोळीबार; माजी डीएसपींनी घडवलं कृत्य, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज्य सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडूंची भेट घेणार

Badamrao Pandit : भाजप प्रवेश होताच माजी आमदार आक्रमक! विजयसिंह पंडित हे अचानक अन् पैशाने झालेले आमदार

Women's World Cup 2025: २० चौकार,४ षटकार... सेमीफायनलमध्ये द. आफ्रिकेच्या कर्णधाराचं वादळी शतक; विश्वविक्रमही केला नावावर

'रश्मिका मंदानाला लागले आई होण्याचे वेध...' बाळाबद्दल बोलताना म्हणाली...'योग्य वयात बाळ झालं की...'

SCROLL FOR NEXT