Afghanistan Channel Social Media
व्हायरल-सत्य

Fact Check: अफगाणिस्तानमधील जुना व्हिडिओ भाजप आणि काँग्रेस नेत्यांमधील भांडणाचा असल्याचे सांगत होत आहे व्हायरल

Viral Video: वर्षभर चाललेल्या वांशिक संघर्षाची छाया राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीवर पडली आहे. मणिपूरमध्ये 19 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Created By: Newschecker

Translated By : सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये न्यूज चॅनेलवर पॅनेल चर्चेदरम्यान दोन व्यक्तींमधील भांडण दिसत आहे. सोशल मीडियावर काही युजर्सनी हा व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, यामध्ये काँग्रेस आणि भाजपचे प्रवक्ते एकमेकांशी भांडताना दिसत आहे.

एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

वर्षभर चाललेल्या वांशिक संघर्षाची छाया राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीवर पडली आहे. मणिपूरमध्ये 19 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. दरम्यान कारण अनेक नागरी समाज गट आणि प्रभावित लोक वारंवार होणाऱ्या संघर्षांदरम्यान निवडणुका घेण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

सत्य

न्यूजचेकरने व्हिडिओच्या कीफ्रेम्सची रिव्हर्स इमेज सर्च केली, तेव्हा त्यांना 21 फेब्रुवारी 2019 रोजी “काबुल टीव्ही गेस्ट फाईटिंग” असे शीर्षक असलेला Youtube व्हिडिओ सापडला.

न्यूजचेकरला 19 फेब्रुवारी 2019 रोजीचा पाकिस्तान-आधारित द न्यूज इंटरनॅशनल अहवाल देखील आढळला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये थेट प्रसारित झालेल्या एका टीव्ही कार्यक्रमातील दोन प्रवक्तांमध्ये ऐकमेकांशी भांडण झाले.

या सर्व पुराव्यावरुन असे अढळले की, जून 2016 मध्ये अफगाणिस्तान वृत्तवाहिनी, 1 TV काबुल, वर एका कार्यक्रमात दोन प्रवक्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामुळे या व्हिडिओमध्ये काँग्रेस आणि भाजपचे प्रवक्ते मणिपूरस्थित वृत्तवाहिनीवर ऐकमेकांशी भांडत नसल्याचे सिद्ध होते.

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ अफगाणिस्तान टीव्ही चॅनेलवरील बातम्यांच्या चर्चेदरम्यान झालेल्या भांडणाचा असून, मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी पॅनेल चर्चेदरम्यान काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये भांडण झाल्याचा खोटा दावा यासोबत करण्यात येत आहे.

'न्यूजचेकर' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : तिघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा खात्मा, पिंपरखेडमध्ये शार्पशूटरने झाडल्या गोळ्या

Pune Weather : पुणे गारठणार! पुढील 3-4 दिवसांत तापमानात मोठी घट; हवामान विभागाचा अंदाज

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

SCROLL FOR NEXT