Pakistani Flag Hoisted In Shiv Sena UBT Rally In South Mumbai, Claims Nitesh Rane. Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा नितेश राणे यांचा दावा, वाचा काय आहे सत्य

Nitesh Rane: शेवटच्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जागांमध्ये मुंबई परिसरातील अधिक जागांचा समावेश आहे. त्यामुळे येथे भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये चुरस आहे.

आशुतोष मसगौंडे

देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान देशासह महाराष्ट्रात चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. महाराष्ट्रात आता पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे.

या शेवटच्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जागांमध्ये मुंबई परिसरातील अधिक जागांचा समावेश आहे. त्यामुळे येथे भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मोठी चुरस आहे.

अशात भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत, शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा दावा केला आहे. (Pakistani Flag Hoisted In Shiv Sena UBT Rally In South Mumbai, Claims Nitesh Rane)

दावा

भाजप नेते आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आज एक्सवर एक पोस्ट करत व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये राणे यांनी म्हटले आहे की, "शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकत आहे. आता PFI, SIMI, AL QAEDA चे लोक मातोश्रीत बिर्याणी घेऊन जातील. हे दाऊद च मुंबईत स्मारक पण बांधतील. आणि म्हणे हा मा.बाळासाहेबांचा “असली संतान”.

'एक्स'वरील (X) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा दावा करणारी नितेश राणे यांची एक्स पोस्ट.

सत्य

दरम्यान नितेश राणे यांनी शिवसेना (UBT) पक्षाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याच्या दाव्यामागील सत्यता 'सकाळ'ने तपासली. आम्ही केलेल्या तपासात हे स्पष्टपणे आढळले की, राणे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फडकत असलेला झेंडा पाकिस्तानचा नसून, भारतीय मुस्लिम हा धार्मिक ध्वज म्हणून वापरतात.

यानंतर आम्ही पाकिस्तानच्या झेंड्याविषयी माहिती घेतली. त्यावेळी आढळले, की पाकिस्तानचा झेंडा पूर्णपणे हिरवा नाही. त्यांच्या गडद हिरव्या रंगाच्या झेंड्यामध्ये उजव्या बाजूला एक पांढरा पट्टा आहे. तसेच मध्यभागी चंद्रकोर आणि पाच टोकांचा तारा आहे.

हे सर्व पाहिल्यानंतर स्पष्ट होते की, नितेश राणे शिवसेनेच्या (UBT) मिरवणूकीत पाकिस्तानचा झेंडा फडकल्याचा करत असलेला दावा खोटा आहे.

पाकिस्तानचा झेंडा खाली दिलेल्या फोटोप्रमाणे दिसतो.

पाकिस्तानचा झेंडा असा दिसतो.

दरम्यान हा व्हिडिओ दक्षिण मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारफेरीतील आहे. देसाई यांच्या प्रचारार्थ चेंबूर येथे ही मिरवणूक आयोजित केली होती. यावेळी राणे दावा करत असलेल्या झेंड्यासह शिवसेना (UBT), काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील पक्षांचे झेंडेही दिसत आहेत.

निष्कर्ष

नितेश राणे करत असलेल्या दाव्याची 'सकाळ'ने तपासणी केल्यानंतर असे आढळले की, शिवसेनेचे (UBT) दक्षिण मुंबईतील उमेदवार यांच्या प्रचार मिरवणुकीत फडकत असलेला झेंडा भारतातील मुस्लिम धर्मियांचा असून, तो पाकिस्तानचा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI पेमेंटला नवे पर्याय! GramPay आणि Viyona Pay लॉन्चसाठी सज्ज, अखेर मान्यता मिळाली

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Asia Cup 2025: अजिंक्य रहाणे म्हणतोय, भारतीय संघाच्या 'या' खेळाडूला हलक्यात घेऊ नका, ठरू शकतो हुकमी एक्का

Bidkin Accident : अज्ञात वाहनाने दिलेल्या हुलकावणीमुळे दुचाकीचा अपघात; एक तरुण ठार, एक जण गंभीर जखमी

Gas Leakage : बोईसर तारापूरमध्ये वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट

SCROLL FOR NEXT