sambhal mosque survey hindu idols misleading images shared esakal
व्हायरल-सत्य

Fact Check : संभलच्या मशिदीत हिंदू देवतांच्या ४ मूर्ती सापडल्याचा दावा खोटा, व्हायरल पोस्टमागील सत्य जाणून घ्या

Sambhal mosque survey hindu idols misleading claim : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात मुघलकालीन शाही जामा मशिदीच्या सर्व्हेच्या वेळी हिंदू देवतांच्या मूर्ती सापडल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जाणून घेऊया व्हायरल स्क्रीनशॉटमागील सत्य.

Saisimran Ghashi

Created By : Logically Facts

Translated By: Sakal Digital Team

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात मुघलकालीन शाही जामा मशिदीच्या सर्व्हेच्या वेळी हिंदू देवतांच्या मूर्ती सापडल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये चार मूर्तींचे चित्र असलेला एक कोलाज फोटो शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल काय होत आहे?

व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, मुघलकालीन मशिदीच्या संभल मशिदीच्या सर्व्हे दरम्यान १५०० वर्षांपूर्वीच्या शिवलिंग, विष्णूच्या मूर्ती आणि सुदर्शन चक्र सापडले. पोस्टमध्ये हे देखील म्हटले आहे की, "प्रत्येक हिंदूने हे शेअर करावे आणि हिंदू धर्माचे संरक्षण करावे." फेसबुकवर हे शेअर करण्यात आले.

Screenshot of posts shared online.

तथ्य पडताळणी

सोशल मीडियावरील दाव्याच्या सत्यतेची पडताळणी करताना काही महत्त्वाचे पुरावे समोर आले.

पुरावा १

व्हायरल कोलाजमधील तीन चित्रे रिव्हर्स इमेज सर्चद्वारे तपासल्यावर ७ फेब्रुवारी २०२४ रोजी NDTV (Archived इथे पाहा) च्या पोस्टशी मिळतीजुळती आढळली. या पोस्टनुसार, कृष्णा नदीच्या काठावर, कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात शाक्ती नगर परिसरात, NDTV अहवालानुसार ६ फेब्रुवारी २०२४ रोजी, १००० वर्षे जुनी विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग सापडले होते. ही मूर्ती पूल बांधकामादरम्यान आढळली होती आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या (ASI) ताब्यात देण्यात आली होती.

Comparison of Facebook post and NDTV X post.

पुरावा २

The Times of India आणि TV9 Kannada यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये हेच वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तांमध्ये रायचूरमध्ये सापडलेल्या मूर्तींबाबत तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

पुरावा ३

कोलाजमधील चौथे चित्र, ज्यामध्ये सुदर्शन चक्रसारखी वस्तू दिसते, ती एका ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Indiamart साईटवर (Archieve इथे पाहा) सापडली. या वस्तूचे वर्णन "ब्रास सुदर्शन चक्र कलशम" असे आहे, जे तेलंगणातील हैदराबादमधील Kolcharam Art Creations यांनी तयार केले आहे.

पुरावा ४

संभळ मशिदीचा पहिला सर्व्हे १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू झाला होता, जो या मूर्ती सापडण्याच्या घटनेनंतर अनेक महिन्यांनी झाला.

निष्कर्ष

संभल मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंदू देवतांच्या मूर्ती सापडल्याचा दावा खोटा आहे. तीन मूर्ती रायचूर, कर्नाटक येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये सापडल्या होत्या, आणि त्या संभल मशिदीच्या सर्व्हेशी संबंधित नाहीत. चौथ्या मूर्तीचा मूळ स्रोत हा एक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट आहे. संभळ मशिदीच्या सर्व्हेपूर्वीच या मूर्ती सापडल्या असल्याने व्हायरल पोस्टमधील दावा तथ्यहीन आहे.

(Logically Facts या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT