Ashadi wari 2022 sant tukaram maharaj and sant Dnyaneshwar maharaj palkhi at phaltan warkari sakal
वारी

वैष्णवांच्या मांदियाळीचे शाही स्वागत

माउली फलटणनगरीत : रांगोळीच्या पायघड्या अन् पुष्पवृष्टी

विलास काटे

फलटण : परब्रम्ह विठ्ठलाला भेटण्यासाठी निघालेल्या लाखो वैष्णवांची मांदियाळी टाळ-मृदंगाच्या गजरात, माउली-माउली नामाचा जयघोष करीत संस्थानिकांच्या फलटणनगरीत दोन दिवसांच्या मुक्कामी विसावली. पालखी मार्गावरील अर्धा टप्पा सोहळ्याने पार केला. रामरायाच्या आणि महानुभव जैन धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक नगरीत पंढरीच्या वारकऱ्यांचे रांगोळ्यांच्या पायघड्या अन् पुष्पवृष्टी करीत शाही स्वागत करण्यात आले.

तरडगाव येथील तळावर माउलींच्या पादुकांना प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते विधिवत पूजा केली. त्यानंतर सोहळा तरडगावहून फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाला. लाखो वारकरी, विक्रेते, परिसरातील भाविक सोहळ्यात चालत होते. सोहळा काळजमार्गे सुरवडी आणि निंभोरे ओढा येथे आला. येथे विश्रांती घेतल्यानंतर वारकरी पुन्हा फलटणच्या दिशेने चालू लागले. हवामान अधूनमधून ढगाळ, तर कधी ऊन पडत होते. यामुळे वाटचालीत वारकरी घामाच्या धारांनी डबडबले होते. दुपारनंतर वारकऱ्यांची पावले काहीशी मंदावली होती.

फलटण नगरीतील भाविक पालखीच्या स्वागतासाठी निंभोरे ओढ्यापर्यंत येत होते. फलटणकरांकडून दूध, केळी, चिक्की, जेवण दिले जात होते. पालखी सोहळा शिस्तीने फलटण शहरात येऊ लागला तशी दर्शनासाठी येणाऱ्या स्थानिक भाविकांची गर्दी वाढू लागली. शहरात प्रवेश केल्यापासून पालखी तळापर्यंत जागोजागी रांगोळ्यांच्या पायघड्या होत्या. राम मंदिराजवळ सोहळा आल्यावर पालखी दर्शनासाठी आणि पुष्पवर्षावासाठी गर्दी झाली होती.

मुक्त चालणाऱ्या वारकऱ्यांमुळे गैरसोय

बिगर नंबरचे, तसेच सोहळ्यापुढे मुक्त चालणाऱ्यांची संख्या वारीत अधिक आहे. हे वारकरी मिळेल, तिथे आसरा घेऊन राहत होते. त्यांच्यामुळे रांगेत चालणाऱ्या अधिकृत दिंड्यांची गैरसोय होत होती.

आईच्या पुण्याईने आम्ही तिघी बहिणी पहिल्या वर्षी वारी करतो आहे. पहिल्या दिवशी एक किलोमीटरही वारी करता आली नाही. पण दुसऱ्या दिवशीपासून वारकऱ्यांची निष्ठा आणि भक्ती पाहून त्यांच्यातील विठ्ठलाप्रती असलेली ओढ पाहून चालण्याची ताकद मिळाली. वारीत चैतन्याची अनुभूती येते. भगवंत हा मंदिरात नसतो, तो प्रत्येक भक्तामध्ये असतो, याची प्रचिती वारीमध्ये येते.

- आशा काटकर, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर अद्याप कारवाई नाहीच; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची माहिती

Drowning Accident: पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू; लाव्हा येथील घटनेने समाजमन सुन्न

Monsoon Rain : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 3 दिवस कसे असेल हवामान?

Student Survey: 'सातारा जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण'; गळती शून्यावर आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न

Amravati Crime: महिलेची गळा आवळून हत्या; कपड्याने हातपाय होते बांधलेले

SCROLL FOR NEXT