pandharpur wari 2017 
वारी

यंदा वेळेवर पाऊस पडल्याने पायी वारीला कमी गर्दी

संतोष सिरसट

पालखी मार्गावरून : राज्यात यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम थेट संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर झाला आहे. राज्यातील शेतकरी परेणीच्या कामात गुंतला असल्यामुळे पायी वारी करणाऱ्या भाविकांची गर्दी यंदा कमी असल्याचे दिसून येते.

मागील वर्षी राज्यात पावसाळ्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्यांची गडबड नव्हती. त्यामुळे मागील वर्षी दिंडीमध्ये पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. यंदाचे चित्र मागील वर्षापेक्षा एकदम उलटे असल्याचे पायी चालणाऱ्या भाविकांनी सांगितले. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र या राज्यातील वेगवेगळ्या विभागातून आषाढी वारीसाठी भाविक पालख्यांसोबत चालत पंढरीला जाण्यासाठी येतात.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी बुधवारी जिल्ह्यात आली आहे. जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते येथे झाला. नातेपुते येथे सायंकाळी सहाच्या सुमारास समाज आरती झाली. त्यापूर्वी पालखीचे नातेपुते येथे स्वागत करताना त्या गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यामध्येही पालखीमध्ये असलेल्या गर्दीची चर्चा सुरू होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गर्दी कमीच असल्याचा निष्कर्ष त्यांच्या चर्चेतून निघाल्याचे जाणवले. 
यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्याने शेतकरी खरीपाच्या पेरण्यांमध्ये गुंतला आहे. विठ्ठलाने यंदा शेतकऱ्यांना सुखी ठेवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे पावसाळ्याच्या सुरवातीलाच चांगला पाऊस पाडल्याचेही मत अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केले. 

मागील 10-12 वर्षापासून आम्ही संत ज्ञानेश्‍वर माहाराजांच्या पालखीसोबत असतो. आम्ही सासवड मधून पालखीसोबत पायी चालत येतो. मागील 10-12 वर्षाचा विचार करता यंदाच्या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत गर्दी कमी असल्याचे जाणवते.
- सुरेश वाघमोडे, वारकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi : १४ व्या वर्षी वैभवचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड! भन्नाट सेलिब्रेशन अन् आरोन जॉर्जसोबत विक्रमी भागीदारी

IPO Updates : उघडण्याआधीच IPO चर्चेत! ग्रे मार्केटमध्ये तब्बल 70% पर्यंत प्रीमियम; 9 जानेवारीला ‘हा’ IPO होणार खुला

अभिनेता सागर कारंडे ते शिवसेनेच्या दीपाली सय्यद; बिग बॉस 6 मध्ये दिसणार हे स्पर्धक

DMart Sale : डिमार्ट जानेवारी स्पेशल सेल! संक्रातीनिमित्त 'या' वस्तु मिळतायत जास्त स्वस्त, 20% पासून 80% पर्यंत डिस्काउंट ऑफर्स पाहा

KCC Loan: शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंतचे किसान क्रेडिट कार्ड कर्ज कधीपासून मिळणार? मोठी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT