sant tukaram esakal
वारी

तुकोबारायांची सुद्धा वारी चुकली होती, तेव्हा त्यांनी काय केलं?

धनश्री ओतारी

महाराष्ट्रातील अनेक घराणी आहेत, जी परंपरेने वारकरी आहेत. अगदी संत तुकाराम महाराज याचं घराणं… तुकाराम महाराज यांचे आठवे पूर्वज विश्‍वंभर बाबा हे वारकरी होते. ते संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांचे समकालीन होते. म्हणून तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे की, पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ॥वारी हाच त्यांचा कुळाचार आणि वारी हाच त्यांचा कुळधर्म…हे वारकरी सामूहिक रीतीने उपासना करणारे लोक आहेत. दिंडी आणि फडात त्यांचा वर्षभराचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारी.

हीच वारी जेव्हा तुकोबारायांची चुकते तेव्हा ....

हा पालखी सोहळा सुमारे तीनशे वर्षापूर्वी सुरू झाला. तो आजतागायत अखंड चालू आहे. त्यापूर्वी कोणाही संतांची पालखी त्याच्या जन्मगावाहून आषाढी वारीला पंढरीला नेली जात नव्हती. श्रीनारायण महाराजांनी पालखीच्या सोहळ्याची आणि ज्ञानोबा-तुकाराम भजनाची प्रथा सुरू केली. तशी पंढरीची वारीही श्री तुकाराम महाराजांच्या घराण्यात पिढ्यानपिढया चालू होती.

तुकाराम महाराज सांगतात की, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तिर्थव्रत ॥ या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभरबाबा (तुकाराम महाराज त्यांच्यापासून त्यांना त्यांची आई जाणीव करून देते की तुझ्या वडीलो वडीली निर्धारी चालविली पंढरीची वारी ॥ त्यासी सर्वथा अंतर न करी तरीच संसारी सुफळपणा ॥

म्हणजे, "तुझ्या वाडवडिलांनी पंढरीची वारी निर्धाराने चालवली. आता जाऊ म्हणती पंढरीची वाटे कळीकाळा भय वाटे तू चालीव मातेची आज्ञा शिरसावंद्य मानून विरथाबा दर पंधरा दिवसांच्या एकादशीला पंढरपूरला जाऊ लागले, विषानंतर त्यांचे पुत्र हरी व मुकुंद हे क्षात्रवृत्तीने राहू लागले. देहू सोडून राजाश्रयाला गेले. पुढे त्या राज्यावर इस्लामी परचक्र आले. त्यामध्ये धारातीर्थी पडले. धाकट्या मुलाची पत्नी पतीबरोबर सती गेली.

थोरल्या मुलाची पत्नी गरोदर होती. पुढे तिला मुलगा झाला. त्याचे नाव विठ्ठल ठेवले. त्याने श्री सेवा परत सुरू केली, बोल्होबानंतर पंढरीची वारी श्रीतुकाराम महाराज करू लागले. त्यांची दिंडी मोठी होती. दिंडीत १४०० टाळकरी होते. ही सर्व टाळकरी मंडळी वारीच्या वेळी देहूला जगत असत. तुकाराम महाराज दर वद्य एकादशीला दिंडीसह वर्तमान आळंदीसही जात व कीर्तन करत. ती परंपरा अजूनही चालू आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी आळंदीला श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बांधले, असा उल्लेख Bombay Presidency Volume-Part 3, Poona gazetteer 1885 Page 102 to 104 मध्ये केलेला आहे.

नंतर तुकोबा सर्वांसह मोठ्या सोहळ्याने निघत तुकोबांचा वारीचा नेम कधी चुकला नाही, पण एकदा ते वारीच्या वेळेला आजारी पडले. तशाही स्थितीत ते वारीला निघाले. पण पाऊल उचलेना, वारीला अंत पडल्याचे दुःख श्रीतुकोबांना अनिवार झाले. ते शोक करू लागले. वारीला जाण्याकरिता आलेल्या वारकऱ्यांबरोबर त्यांनी एक २४ अभंगांचे पत्र देवाला दिले.

ते मुळातच गाधेमध्ये पाहावे. प्रसंग फारच हृदयद्रावक व अंतःकरणाला पीळ पाहणारा आहे. नंतर वारकरी पंढरीहून वारी करून संत तुकाराम महाराजांच्या भेटीस आले, त्यांना भेटले. त्या वेळी त्यांना ब्रह्म तेंगणे झाले. श्री तुकोबा वैकुंठाला जाईपर्यंत हा वारीचा सोहळा प्रतिवर्षी पार पाडीत असत. ते कुताला गेले त्या वेळी त्यांची मुले लहान होती. तेव्हा पंढरीच्या वारीची परंपरा तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा यांनी चालू ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT