Eye Kajal
Eye Kajal Sakal
वुमेन्स-कॉर्नर

मेकअप-बिकअप : काजळ वापरताना अशी घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा

डोळे हा अत्यंत नाजूक भाग असल्याने, त्यावर लावणाऱ्या कोणत्याही गोष्टींची विशेष काळजी ही घ्यायलाच हवी. तुम्ही दैनंदिन जीवनात काजळ लावणार असाल तर, काजळामध्ये कोणते घटक वापरले आहेत, तसेच ते चांगल्या प्रतीचे आहे की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. बाजारात अनेक प्रकारचे काजळ मिळतात; पण स्वस्त मिळाले किंवा छान पॅकिंगमधील आहे असे म्हणून खरेदी केल्यास तुमच्या डोळ्यांसाठी ते हानीकारक ठरू शकते.

  • तुमची काजळ पेन्सिल इतर कोणालाही लावायला देऊ नका. यामुळे इन्फेक्शन होण्याची भीती असते.

  • कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असल्यास, काजळ वापरणे टाळलेलेच बरे. कारण यामुळे तुमच्या कॉन्टॅक्ट लेन्सला; तसेच डोळ्यांनादेखील नुकसान पोचू शकते. अशावेळी तुम्ही वरच्या पापणीवर आयलायनरचा वापर करू शकता. यामुळेदेखील डोळे उठून दिसतात.

  • चालत्या गाडी, ट्रेनमध्ये कधीही काजळ लावण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे डोळ्यांना इजा पोचू शकते. काजळ लावताना कोणीही धक्का देणार नाही अशा ठिकाणी बसावे.

  • डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल किंवा सतत चोळावे लागत असतील तर काजळ लावणे टाळावे.

  • कधीही मेकअप रिमूव्ह करूनच झोपावे. काजळ किंवा आयलायनर काढण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा.

  • घरच्या घरीही काजळ तयार करू शकता. यासाठी एरंडेल तेलाचा दिवा लावून, बाजूला चुलीसारख्या वाट्या मांडून त्यावर एखादी प्लेट ठेवावी. त्या प्लेटमध्ये काजळी साचेल. ही साचलेली काजळी एका डबीत काढून घ्यावी व एक-दोन थेंब साजूक तुपाचे टाकावे. तुमचे घरच्या घरी काजळ तयार होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT