kalpana chavla 
वुमेन्स-कॉर्नर

कल्पना चावला, सुनिता विल्यम्स ते स्वाती मोहन; नासामध्ये भारतीय ठसा उमटवणाऱ्या महिला

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- महिलांनी आता जवळपास सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. महिला आता पुरुषांसोबत खांद्याला खांदा देऊन काम करताना दिसत आहेत. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा कमी क्षमता असते, असं कोणीही म्हणू शकणार नाही. जगात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेच्या नासा या संस्थेमध्येही अनेक भारतीय महिलांनी उत्तुंग कामगिरी करुन दाखवली आहे. आतापर्यंत नासामध्ये कोणत्या महिलांची आपला ठसा उमटवलाय हे आपण पाहुया..

कल्पना चावला

-पहिली भारतात जन्मलेली आणि अंतराळात गेलेली महिला
-हरियानातील कर्नाल इथं 17 मार्च 1962 ला जन्म
-दोन वेळा तिने अंतराळ भरारी घेतली
-पृथ्वीच्या 252 ऑर्बिटमध्ये तिने जवळपास 10.4 मिलियन किमी प्रवास केला
-372 तासांहून अधिक काळ ती अंतराळात होती
-एक फेब्रुवारी 2003 ला झालेल्या कोलंबिया अंतराळ यान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सात अंतराळवीरांमध्ये कल्पना चावलाचा समावेश होता. ही दुर्घटना घडण्याआधी काही सेकंदापर्यंत मोहिम यशस्वी झाल्याचा आनंद साजरा केला जात होता. मात्र अवघ्या काही क्षणात टेक्सास शहरात अंतराळ यानासह त्यातील अंतराळवीरांच्या देहाचे अवशेष विखुरले होते.

सुनिता विल्यम्स

-19 सप्टेंबर 1965 ला जन्मलेल्या सुनिताचे वडील भारतीय वंशाचे तर आई स्लोविनयन वंशाची आहे. 1987 मध्ये अमेरिकेच्या नौदलात गेली. 
-दुसरी भारतीय वंशाची महिला जी अंतराळात गेली
-दोन वेळा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ती गेली होती
-29 तासांचा स्पेसवॉक आणि एकूण 195 दिवस तिने अंतराळात घालवले
-महिला अंतराळवीर म्हणून तिच्या नावावर यामध्ये विक्रम नोंदवला आहे.

मधुलिका गुहाथाकुर्ता

-डॉक्टर मधुलिका गुहाथाकुर्ता यांनी मिशन डिझायनर, इन्स्ट्रूमेंट बिल्डर, लेखिका, शिक्षिका आणि नासाच्या हेलिओफिजिक्स विभागाच्या प्रवक्त्या म्हणून काम केलं आहे. 
-कोलकात्यात जन्म झालेल्या मधुलिका या नासाच्या लिव्हिग विथ स्टार या मोहिमेच्या प्रमुख वैज्ञानिक होत्या.
-खगोल भौतिकशास्त्रात त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पद्यव्युत्तर पदवी संपादन केली आहे. 

अनिता सेनगुप्ता

-एरोस्पोस इंजिनिअर म्हणून अनिता सेनगुप्ता यांनी नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये काम केलं आहे. तिथे त्यांना SAGE Venus Entry System डेव्हलप करण्यामध्ये मोठी कामगिरी बजावली.
-अनिता सेन गुप्ता यांनी 2017 मध्ये JPL सोडले आणि एका खासगी कंपनीत काम करण्यास सुरुवात केली.

शर्मिला भट्टाचार्य

-नायजेरियातील लागोस इथं 1964 मध्ये शर्मिला यांचा जन्म झाला. स्टँडफोर्ट, प्रिन्सटन विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं.
-नासाच्या बायेमॉडेल परफॉर्मन्स आणि बिहेवियर लॅबच्या प्रमुख म्हणून शर्मिला यांनी काम केलं आहे. तसंच त्याआधी नासाच्या Ames Research Center मध्ये त्या Payload Scientist होत्या.
-तसंच अॅस्ट्रोबायोनिक्स विभागाच्या प्रमुख वैज्ञानिकही शर्मिला होत्या. त्यांना नासाने एक्सेप्शनल सायंटिफिक अॅचिव्हमेंट मेडलनं 2018 मध्ये गौरवण्यात आलं आहे.

स्वाती मोहन 

-बेंगळुरुत जन्मलेल्या डॉक्टर स्वाती मोहन यांनी नासाच्या मंगळ 2020 मोहिमेत खुप महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. 
-एरोस्पेस इंजिनिअर असलेल्या डॉक्टर स्वाती मोहन या नासाच्या मंगळ 2020 मोहिमेच्या Guidance, Navigation आणि Control Operation च्या प्रमुख होत्या. 
-तसंच नासाच्या नुकत्याच पार पडलेल्या मोहिमेत पर्सिवरन्स रोव्हर रेड प्लॅनेटवर उतरवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. याबद्दल त्यांचे कौतुकही होत आहे.

वंदना वर्मा

-नासाच्या मंगळ 2020 मोहिमेच्या रोबोटिक ऑपरेशन्सच्या प्रमुख इंजिनिअर म्हणून वंदना वर्मा यांच्यावर जबाबदारी होती.
-परसिवरन्स रोव्हर चालवण्यासाठी वापरण्यात येणाऱं सॉफ्टवेअर PLEXIL सह त्याची जबाबदारी वंदना शर्मा यांच्यावर होती. PLEXIL हे एक ओपन सोअर्स प्रोग्रॅमिंग लँग्वेज असून ती तयार करण्यात वंदना यांचेही योगदान आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT