वुमेन्स-कॉर्नर

घरकुल अपुले : सांजवात

सकाळ वृत्तसेवा

मला खरं तर पूर्वीचं असं सगळं मनापासून आवडतं आणि बऱ्याच गोष्टी मनापासून पटतातदेखील- कारण जितक्या स्तोम माजवणाऱ्या गोष्टी आहेत तितक्याच शास्त्रीय कास धरून आलेल्या गोष्टीही आहेत...

- मीनल ठिपसे

मला खरं तर पूर्वीचं असं सगळं मनापासून आवडतं आणि बऱ्याच गोष्टी मनापासून पटतातदेखील- कारण जितक्या स्तोम माजवणाऱ्या गोष्टी आहेत तितक्याच शास्त्रीय कास धरून आलेल्या गोष्टीही आहेत... सध्याच्या युगात जेव्हा सगळं काही आहे तरी मन थाऱ्यावर नाही असं वाटतं किंवा अनेकांच्या कळपातसुद्धा एकाकी वाटतं, तेव्हा या जुन्या चालत आलेल्या गोष्टी अतिशय प्रसन्न करून जातात.. निर्भेळ समाधान देऊन जातात... अर्थात मी नेहमीच म्हणत आलीये, की मूर्तीपूजा नाही; पण श्रद्धा हवी!

अशाच काही जुन्या गोष्टींमधील एक म्हणजे सांजवात. देवाला दूध साखर नैवेद्य... अगदी थोडकेच, एखादे फूल, उदबत्ती आणि प्रसन्नपणे तेवणारी एक सांजवात... हा एक परिपाठ होता. पूर्वी दिवे नव्हते. पुरुष लोक कामावरून परत यायचे, चिमणी पोरं खेळून घरट्यात परतायची, पाखरं घराकडे परतायची तेव्हा स्वच्छ हात पाय धवून परवचा म्हणायला बसायची. ‘शुभंकरोती’चे मंगल सूर कानी यायचे, तुळशीसमोर दिवा लावला जायचा आणि ‘आज उत्तम दिवस पदरी दिलास, आता हा अंधःकार संपून एक रम्य सकाळ बघायला आणि आला दिवस आनंदात जाऊ देत, घर हसतं खेळतं राहू देत, दूधदुभतं राहू देत,’ अशी प्रार्थना केली जायची.

...हळूहळू सगळंच बदललं... नवीन गोष्टी आत्मसात केल्याच पाहिजेत, शिकल्या पाहिजेत; पण हे जुने संस्कारही तेवढेच महत्त्वाचे आहेत. मला तर अगदी आठवतं, माझ्या एका मैत्रिणीच्या घरी तर खरंच इतका काही प्रसन्न भाव असायचा... नेटकं चौकोनी कुटुंब. अगदी टीचभर घर...आई-वडील दोघंही नोकरी करणारे; पण त्या काकू रोज म्हणजे रोज छोटा का होईना गजरा घालणार, साडी अगदी मुलींकडून एकसारखी करून घेणार. कपडेसुद्धा इतके नीट वाळत घालणार हे लोक की इस्त्रीची गरजच पडू नये. काका आधी येणार, तोपर्यंत पोरी देवासमोर छोटासा का होईना दिवा लावणार....ताजा भाताचा कुकर आणि काकू आल्या, की अगदी भरभर आवरून अगदी हसतखेळत, खालीच फरशीवर बस्तर घालून जेवायला बसणार. पदार्थ अगदी जेमतेम...पहिला गरम वरण भात, तूप, लिंबू, मीठ, नंतर सकाळीच केलेली पोळी आणि भाजी...काकांनी केलेली ताजी कोशिंबीर आणि नंतर दही दूध भात! अगदी हसतंखेळतं आणि सुंदर आयुष्य! ती संध्याकाळची सांजवात आणि ते प्रसन्न चेहरे आजही नवीन हुरूप देतात.

माझी आईही अगदी नक्की सांजवात करते. पूर्वी आजीबरोबर रामरक्षा आणि शुभंकरोती नक्की व्हायची. आजीचं स्तोत्रपठण तर केवळ उत्कृष्ट!...त्यामुळे आजही आमचं पाठांतर आणि उच्चार बरेच चांगले आहेत. मीही सांजवात करते. धुपाचा गंध, अगदी नाजूक तेवणारी सांजवात आणि त्याबरोबर मिळणारी प्रचंड ऊर्जा !!!!....घरभर त्या लहरी पसरलेल्या असतात आणि उद्याची उमेद घेऊन येतात.. माझा मुलगा पूजा करतो; पण त्याला फार या गोष्टींत रस नाही; पण लेक मात्र अतिउत्साही...नवीन पिढीला हा संस्काराचा अमूल्य ठेवा देता यायला हवाय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT