टिकली
टिकली sakal
वुमेन्स-कॉर्नर

'कपाळ माझं आहे, मी ठरवेल लावायची की नाही कुंकू, टिकली'

दिपाली सुसर

आमचं नवीनच लग्न झालं अन् मी दिल्लीत राहायला आले. मी घरातली सगळी कामं आवरून बाहेर निवांत बसली होती. तितक्यात फोन वाजला. बघते तर आमच्या घरमालकिणीचा फोन होता. बराच वेळ बोलल्या त्या. अन् मग हळूच 'आप बिंदी नहीं लगाती क्या बिट़िया?' असा प्रश्न त्यांनी विचारला.

मला कळलंच नाही काही सेकंद. मग त्यांनी बोलणं सुरू ठेवलं. त्यांनी पुढे जे सांगितलं, ते ऐकून मला धक्काच बसला.

झालं असं की, आमच्या घराच्यावर तिन-चार मजले आहेत. त्यापैकी दुसऱ्या मजल्यावरच्या काकुंनी आमच्या मालकिनीला फोन करून सांगितलं की, "तुमच्या घरात जे भाडेकरू राहतात, त्या मुलीचं लग्न झालंय असं वाटत नाही. तिच्याकडे बघून वाटतं की, ते दोघे लिव्ह-इनमध्ये राहतात. ''वो तो ना बिंदी लगाती है, ना मांग में सिंदूर लगाती है. ना मेकअप करती है, ना हाथोंमें चुड़ीया पेहनती है.''

फोन ठेवताठेवता मालकीन बाई बोलल्या की, "आपकी शादी हो गई है, शादीसुदा औरत की तरह रहा करो." आणि त्यांनी मग फोन ठेवला.

तेव्हा माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं. अनेक प्रश्न मनात आले. एखाद्या बाईचं लग्न झालंय हे कळणं समाजासाठी इतकं महत्त्वाचं का असतं? लग्न झालेल्या पुरुषांना अशी कुंकू, टिकली, बिंदी, मंगळसूत्र 'लायसन्स' का नसतात, जे की त्यांचं लग्न झालंय हे समाजाला ठासून सांगू शकतील? बाईनेच टिकली का लावावी, मंगळसूत्र तिनेच का घालावं? असे असंख्य प्रश्न डोक्यात भडीमार करत उभे राहले.

तर आज हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर कुंकू, टिकली, बिंदी यावर जोरात चर्चा सुरू आहे.

बाईने कुंकू लावावं की लावू नये? फक्त हिंदू स्त्रियाच कुंकू-टिकली लावतात का? 'नो बिंदी नो बिझनेस', 'माझी टिकली माझा स्वाभिमान', अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर लिहिलेल्या दिसून येत आहे.

काही महिला-पुरुष म्हणत आहेत की, कुंकू-टिकली हे हिंदू धर्माचं प्रतीक आहेत, तर कुणी म्हणतात असं काही नाहीये. काही महिलांचं म्हणणं आहे, आम्हाला टिकली लावायची असेल, तर आम्ही लावू, तुम्ही कोण आमच्यावर जबरदस्ती करणारे? कपाळ माझं आहे, मी ठरवेल लावायची काही नाही टिकली, असंही काही जणींचं मत आहे.

पण, बारीकशा कुंकू, बिंदी, टिकलीवरुन इतकं कसं वातावरण तापलंय, असा प्रश्न आता तुमच्या मनात आला असेल. हे नेमकं प्रकरण काय आहे हे आधी पाहूया. तर हा वाद सुरू झाला एका जाहिरातीपासून. 'फॅब इंडिया' या फॅशन ब्रँडची ती जाहिरात. या ब्रँडनं दिवाळीसाठीच्या आपल्या एका विशेष कलेक्शनला 'जश्न ए रिवाझ' हे उर्दू नाव दिलं.

हे नाव काही सोशल मीडिया वापरकर्त्यांना पटलं नाही. कारण उर्दू ही मुस्लिमांची भाषा आहे आणि दिवाळी हा हिंदूंचा सण आहे, असं त्यांचं त्यामागचं म्हणणं आहे. मग त्यांनी फॅब इंडियावर बहिष्कार टाकला आणि टिकलीवरच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. त्यानंतर फॅब इंडियांनं लगेच ही जाहिरात मागे घेतली. पण हा वाद तिथंच थांबला नाही.

हळुवार या वादात मग टिकलीने उडी घेतली. ती कशी तर या जाहिरातीत दिसणाऱ्या मॉडेल्सनी पारंपरिक वेष परिधान केला, पण त्यांनी कुंकू, टिकली लावलेली नव्हती. त्यामुळे मग ही हिंदूंच्या दिवाळी सणाची जाहिरात असू शकत नाही, अशी चर्चा सुरू झाली.

एक महिला म्हणून मला काय वाटतं?

आता मी वरती तुम्हाला माझा जो अनुभव सांगितला, त्यावरून मला हे प्रकर्षानं जाणवलं की, ठिकाणं बदलतात पण, बाईवरची बंधनं कायम राहावी ही मानसिकता मात्र सगळीकडे कायम राहते.

जे मी माझ्या छोट्याशा गावात अनुभवलं, तेच देशाच्या राजधानीतही अनुभवायला मिळालं.

पण, टिकली, कुंकू, बिंदी यांच्या वापरावरून एखादी स्त्री तिच्या धर्माचा आदर करते की नाही, हे कसं ठरवलं जाऊ शकतं? महिलेनं तिला वाटतं तसं राहावं, की स्वतंत्र राहावं, हे ठरवण्याची चॉईस तिची असणार की समाजाची?

माझं सागायचं झालं तर मीही लावते टिकली, कुंकू. पण ते सणावाराला. सण समारंभात मला नटायला आवडतं. पण, दररोज माझ्याकडून ते शक्य नाही आणि कुणी माझ्यावर ते लादूही शकत नाही. जेव्हा केव्हा एखादी गोष्ट मग ती संस्कृती किंवा धर्माच्या नावावर लादायची भाषा येते, तेव्हातेव्हा स्त्री किंवा पुरुषाचंही स्वतंत्र अस्तित्व बाजूला पडतं, असं मला वाटतं.

माझ्या तर मुस्लीम मैत्रिणीही टिकली लावतात. का तर ते त्यांना आवडतं. म्हणून मला वाटतं, इथं सगळ्यात जास्त मुद्दा हाच महत्त्वाचा आहे की, तिला काय वाटतं? तिला एखादी गोष्ट आवडत असेल तर ते ती करेल, नसेल आवडत तर नाही करणार, इतकं साधं गणित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT