Vehicle
Vehicle 
युथ्स-कॉर्नर

झूम... : गाडीचे मायलेज वाढविण्यासाठी....

चंद्रकांत दडस

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मात्र, वाहन चुकीच्या पद्धतीने चालविल्यामुळेही आपले बजेट कोलमडू शकते. त्यामुळे ड्रायव्हिंग स्टाइल कशी ठेवावी व बजेट कसे कमी करावे यासाठी काही टिप्स... 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आक्रमक ड्रायव्हिंग स्टाइल
आक्रमक ड्रायव्हिंग स्टाइलमुळे पेट्रोल सर्वाधिक खर्च होते. वाहनाच्या स्पीडोमीटरवर एक हिरवी पट्टी असते, त्यास ‘इकॉनॉमी रेट’ म्हटले जाते. वाहनाचा वेग या पट्टीवर ठेवाल तितके अधिक मायलेज मिळेल. मात्र, अनेक लोक याचा विचार न करता वेगाने वाहन चालवतात. एका संशोधनानुसार, अतिशय वेगाने वाहन चालवल्यास पेट्रोल खर्ची होण्याचे प्रमाण जवळपास ३३ टक्‍क्‍यांनी वाढते. वाहनाचा वेग सतत कमी जास्त केल्यानेही त्याचा थेट परिणाम मायलेजवर होतो.

जास्त गर्दीत प्रवास
वाहतूक कोंडीमुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसतात. वाहन बंदही करता येत नाही. बाहेर उकाडा असल्याने एसी सुरू ठेवण्यासाठी वाहनाचे इंजिन सुरू ठेवावे लागते. यामुळे पेट्रोल खर्ची पडते. पेट्रोल आणि मानसिक त्रासापासून वाचायचे असल्यास ड्रायव्हिंगला निघण्यापूर्वी वाहतूककोंडी आहे का, याची माहिती घ्या. 

गिअर शिफ्टिंग
एक्‍सिलरेशन आणि गिअर शिफ्टिंगमुळेही वाहनातील इंधन खर्ची पडते. अनेक लोक वाहन सुरू करताना पहिल्या गिअरमध्येच अधिक वेग मिळवण्यासाठी फुल एक्‍सलरेशनचा प्रयोग करतात; मात्र यासाठी अधिक इंधन खर्ची पडते. वाहनतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम ड्रायव्हिंगसाठी कमीत कमी ३० सेकंदांपर्यंत वाहनाचा वेग स्थिर असावा. त्यानंतर अधिक वेग मिळवण्यासाठी गिअर एक्‍सलरेशन आणि गिअर शिफ्टिंग करता येऊ शकते.

एअर कंडिशनरचा वापर
सध्या सतत बदलणाऱ्या हवामानामुळे वाहनात एअर कंडिशनरचा (एसी) वापर करणे गरजेचे झाले आहे. एअर कंडिशनरचा एक बेल्ट थेट इंजिनशी जोडलेला असतो. एसी वेग जास्त असल्यास अधिक इंधन खर्ची पडते व मायलेज कमी होत राहते. त्यामुळे वाहन सुरू केल्यानंतर एक उत्तम वेग पकडल्यानंतरच एसी सुरू करा. आवश्‍यकता असल्याच एसीचा वापर केल्याने अधिक इंधन लागणार नाही. कारच्या काचा बंद करूनच प्रवास करा. काचा उघड्या ठेवल्यास हवा वेगाने कारमध्ये येते आणि गाडीचा वेग कमी होतो. यामुळे अधिक एक्‍सलरेशनचा प्रयोग करावा लागतो. यामुळे पेट्रोल अधिक खर्च होते.

चाकांमधील हवा
वाहन मायलेज कमी देणे याचे प्रमुख कारण वाहनांमधील हवा कमी असणे हेही आहे. वाहन चालविण्यापूर्वी चाकांमध्ये हवा योग्य प्रमाणात आहे ना, याची खात्री नक्‍की करून घ्या. वाहनासाठी चांगल्या दर्जाच्या टायरचा वापर करा. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT