Ruchi Lunch Home Sakal
युथ्स-कॉर्नर

खाद्यभ्रमंती : रत्नागिरीचं रुची लंच होम

मध्यंतरी पुण्यात सदाशिव पेठेत एके ठिकाणी ‘रुची लंच होम, रत्नागिरी’ हा बोर्ड पाहिल्यानंतर त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.

आशिष चांदोरकर

मी तेव्हा ‘सकाळ’मध्येच होतो. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि त्यांचे समर्थक सुभाष बने यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला. त्यामुळं लागलेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं रत्नागिरीला जाणं झालं. जवळपास आठवडाभर होतो तिथं. त्यावेळी दोन ठिकाणी आवर्जून जाणं व्हायचं. पहिलं म्हणजे, बंदर रोडवरचं ‘रुची लंच होम’ आणि मारुती मंदिराजवळचं ‘शुभम’. रुची प्युअर व्हेज, तर शुभम पक्कं मांसहारी. त्या दोन्हींची चव आजही लक्षात आहे.

मध्यंतरी पुण्यात सदाशिव पेठेत एके ठिकाणी ‘रुची लंच होम, रत्नागिरी’ हा बोर्ड पाहिल्यानंतर त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. मी आणि योगेश बिडवई दिवसभराचं प्रचाराचं कव्हरेज आटोपून रात्रीच्या सुमारास बाजारपेठेत असलेल्या ‘रुची’मध्ये पोहोचलो. एक साधी खाणावळ आणि जेवण घरगुती पद्धतीचं. मी आणि मित्रवर्य योगेशनं साधी राइस प्लेट मागविली. पोळी किंवा भाकरी नि भाजी, क्वचित कधी डाळिंब्याची उसळ, आमटी-भात, चटणी-कोशिंबीर सर्वच एकदम स्वादिष्ट... योगेश म्हटला, मस्त काजुगराची उसळ मागवू. आता थोडंफार माहिती आहे, पण तेव्हा मी बऱ्यापैकी नवशिका होतो. काजूगर म्हणजेच ओले काजू आणि ओल्या खोबऱ्याच्या वाटणाचा वापर करून केलेली उसळ हा फारच अप्रतिम पदार्थ आहे, हे मला त्या ठिकाणी माहिती होणार होतं. आम्ही काजूगराची उसळ मागविली आणि सर्व जेवण एकीकडं नि काजूगराची उसळ एकीकडं, अशी परिस्थिती झाली.

रुची आणि काजूगराची उसळ हे समीकरण डोक्यात पक्कं बसलं, ते तेव्हापासूनच. मासे खायचे असल्यास ‘शुभम’ आणि मस्त घरच्यासारखं शाकाहारी जेवायचं असेल, तर ‘रुची’ हे आमचं कायमस्वरूपी ठरून गेलं. नंतर दोन-तीनदा रुचीमध्ये जाणं झालं. ना कधी चव बदलली, ना कधी मेन्यू बदलला. बदलली ती मॅनेजमेंट. अर्थात, त्यानंतरही चवीत फार बदल झाल्याचं ऐकिवात नाही. मावळंकरांनी १९९८मध्ये ‘रुची’ सुरू केलं आणि हनुमंत ताटके हे २०१२मध्ये रुची लंच होम चालवू लागले.

ताब्यात घेतल्यानंतर ताटके यांनी २०१५मध्ये लगेच आरोग्य मंदिर इथं ‘रुची’ची दुसरी शाखा सुरू केली. थाळीतही थोडे बदल केले. म्हणजे काजूगराची उसळ रेग्युलर थाळीत समाविष्ट केली. थाळी व्यतिरिक्त पुन्हा उसळ घ्यावी लागणं बंद झालं. बासुंदीची वाटी अॅड झाली. मधुमेहींसाठी स्वतंत्र थाळीची सुविधा निर्माण झाली. नाचणीची भाकरी, मोड आलेल्या कडधान्याची उसळ, मेथीचं लोणचं, कारल्याची भाजी, वऱ्याच्या तांदळाचा भात ही थाळी अल्पावधीतच मधुमेही मंडळींना आवडू लागली. भविष्यात एसीमध्ये बसून भोजनाची व्यवस्था देखील उपलब्ध झाली.

काही वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यातही रुची लंच होमची शाखा सुरू केली. सदाशिव पेठेत. पूर्वी ‘लज्जत’ होतं त्या ठिकाणी. पण आता ‘लॉकडाउन’मुळं ते बंद आहे. भविष्यात पुण्यात नव्या ठिकाणी नव्या जोमानं ‘रुची लंच होम’ सुरू होईलच, पण तोपर्यंत थांबण्याची काहीच आवश्यकता नाही. कधी रत्नागिरीला जाणं झालं तर सकाळ किंवा संध्याकाळचं जेवण ‘रुची’मध्ये नक्की घ्या...आणि काजूगराच्या उसळीचा आठवणीनं आस्वाद घ्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT