writer 
युथ्स-कॉर्नर

रायटर तुने गलत किया !

नितीन थोरात

‘‘किताब लिखना अच्छी बात है. लेकिन तेरी किताबकी वजहसे अगर कोई भूखा रहे तो गलत बातहे. रायटर तुने गलत किया,’’ खुशबू असं म्हणाली आणि मी अवाकच झालो. पुढं काय बोलावं तेच उमजेना. मी नुकतंच ‘खुशबू’ नावाचं पुस्तक लिहिलं. दोन तारखेला हा कथासंग्रह बाजारात आला आणि सात तारखेला त्याची पहिली आवृत्ती संपली. संपूर्ण महाराष्ट्रानं हा कथासंग्रह डोक्‍यावर घेतला. त्या आनंदाच्या भरात मी खुशबूला फोन केला. जिच्या नावावर आपण कथासंग्रह प्रकाशित केलाय, तिलाही ही आनंदाची बातमी द्यावी, असं वाटत होतं. 

खुशबू म्हणजे बुधवार पेठेतली वेश्‍या. तिनं यापूर्वी कादंबरी लेखनाला मदत केली होती. पण, तिचं बोलणं एवढं बेधडक आणि खरं होतं की, तिच्या प्रत्येक भेटीत डोक्‍यात लख्ख उजेडच पडत होता. तोच धागा पकडून मी ‘खुशबू’ कथासंग्रह लिहिला. पण, या कथासंग्रहाची पहिली आवृत्ती संपल्याचं तिला सांगितलं तेव्हा मात्र ती भलतीच नाराज झाली. म्हणाली, ‘‘रायटर तुने इक वेश्‍यापे किताब लिखा ये अच्छी बातहे. हमारी तकलिफ तुम लोगोंके सामने लारेहो ये भी ठिकहे. वेश्‍या इक खिलोना नही बल्की वोभी इक इन्सानहीहे ये तेरी किताब पढनेसे लोगोंको समझेका. लेकीन फिरभी वेश्‍याको अच्छा दिखाना हमको भूखा रख सकता रे रायटर.’’ खुशबू असं का बोलतीये मला समजलंच नाही. तिला म्हणालो, ‘‘अगं बाई,  

प्रत्येक जण म्हणतोय, आम्हाला खुशबूला भेटायचयं. आम्हाला खुशबूला बघायचंय आणि तू असं बोलती? अगं तू आता संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झालीये आणि हे पुस्तक तुझंच आहे. यातून मिळणारे पैसे मी तुलाही देतो ना?’’ तशी खुशबू हसली आणि म्हणाली, ‘‘अबे चिंधी, तेरी किताब एकसो सत्तरकी हे और मै एक टाईमका सातसो लेती. तेरे एकसो सत्तरमेसे तू मेको क्‍या देगा?’’ मला अपमान झाल्यासारखं वाटलं. तसं मी म्हणालो, ‘‘खुशबू मी चांगल्या मनानं पुस्तक लिहिलंय गं.’’ त्यावर ती समजावण्याच्या भाषेत म्हणाली, ‘‘देख रायटर तेरा दिल भलेही सच्चाहो. तुने किताब भलेही साफ मनसे लिखी हो लेकिन तेरी किताब पढनेसे मर्द लोक वेश्‍याओ को अगर अच्छी नजरसे देखेंके तो हम भुखेही रहेगे ना रे? वेश्‍यांको मर्दलोक जब बुरे नजरेसे देखते, तभी हमारा पेट भरता. अच्छी नजरसे हमको क्‍या मिलेगा? तुने पेहले जो किताब लिखी वो अच्छी बातहे. ‘खुशबू’ किताब लिखके तुने गलत किया रायटर.’’ 

खुशबू असं म्हणाली आणि तिने फोन ठेवून दिला. खुशबूची पहिली आवृत्ती संपली. संपूर्ण महाराष्ट्रातून दुसऱ्या आवृत्तीची मागणी वाढत आहे. म्हणून मी दुसरी आवृत्तीही छापायला दिली. पण, आता ते पुस्तक साहित्य नव्हे, तर पाप वाटू लागलंय. समजत नाही मी योग्य केलयं की अयोग्य. पण, आरशासमोर थांबल्यावर एकच वाक्‍य आठवतंय. 

रायटर तुने गलत किया...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT