Luxurious-Cars 
युथ्स-कॉर्नर

झूम : लक्झरियस कारची ‘सफर’

प्रणीत पवार

जॅग्वार, ऑडी यांसारख्या लक्झरियस कार कंपन्यांनी आपली नवनवीन; तसेच फेसलिफ्ट मॉडेल नुकतीच भारतीय बाजारात आणली आहेत. इतर भारतीय कार कंपन्यांबरोबरच या लक्झरियस कारनाही भारतात मोठा ग्राहक/चाहता वर्ग आहे. त्याच अनुषंगाने या कार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी नवे पर्याय आकर्षक फीचर्स, अंतर्गत-बाह्य बदलांसह बाजारात आणले आहेत. याचाच आढावा आपण या लेखात घेणार आहोत.

जॅग्‍वार इलेक्ट्रिक ‘आय-पेस’
लक्झरियस आणि तेवढ्याच किमती कारसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जॅग्‍वार लँड रोव्‍हर (Jaguar and Landrover - JLR) कार कंपनीने इलेक्ट्रिक ‘आय-पेस’ची (I-Pace) भारतात घोषणा केली. एसयूव्ही श्रेणीतील ही कार जग्‍वार लँड रोव्‍हरकडून भारतामध्‍ये सादर झालेली पहिली इलेक्ट्रिक कार ठरली आहे. आय-पेस अत्‍याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानांचा वापर करून डिझाईन करण्‍यात आली आहे. आय-पेसमध्ये ९० केडब्‍ल्‍यूएच क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. शिवाय २९४ केडब्‍ल्‍यू पॉवर आणि ६९६ एनएम टॉर्क देण्यात आल्याने ती ०-१०० किलोमीटर प्रतितास वेग ४.८ सेकंदांमध्‍ये घेते.

स्पेसिफिकेशन

  • सॉफ्टवेअर ओव्‍हर द एअर (एसओटीए) सिस्टिममधून इन्‍फोटेन्‍मेंट, बॅटरी नियोजन आणि चार्जिंग अशा यंत्रणा अद्ययावत करता येतात.
  • ३-डी सराउंड कॅमेरामुळे आसपासच्‍या भागाचे डिजिटल प्‍लॅन व्‍ह्यू.
  • क्‍लिअरसाइट रिअर व्‍ह्यू मिरर व्हिजन सुविधा.
  • ३१.२४ सेंटिमीटर (१२.३ इंच) एचडी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर
  • वायरलेस डिवाइस चार्जिंग पॅड, सिग्‍नल बूस्टिंग, अॅपल कार प्‍ले आणि अँड्रॉइड ऑटो स्‍मार्टफोन पॅक
  • ब्ल्‍यूटूथ तंत्रज्ञान एकाच वेळी दोन फोनना कनेक्‍ट होऊ शकतो.
  • एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ४७० किलोमीटर धावणार
  • आय-पेसची किंमत १ कोटी ५ लाख रुपये (एक्स शोरूम).

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑडी ‘एस ५’ स्पोर्टबॅक
जर्मन लक्झरी कारनिर्माती कंपनी ऑडीने (Audi) फेसलिफ्ट ‘एस ५’ स्पोर्टबॅक (Audi S-5 sportback )ही सेदान प्रकारातील दुसरी नवी कार भारतात यंदा सादर केली. यापूर्वी २०१७ मध्ये ही कार लाँच झाली होती. एस ५ स्पोर्टबॅकमध्ये ३५४ एचपी क्षमतेचे ३.० लिटर ‘टीएफएसआय’ पेट्रोल इंजिन देण्यात आले असून जे ५०० एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार ० ते १०० किलोमीटर प्रतितासाचा वेग ४.८  सेकंदामध्ये गाठते. या कारमध्ये १२.३ इंचीचा व्हर्च्युअल कॉकपीट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन

  • २,९९४ सीसी पेट्रोल इंजिन
  • ८ स्पीड टिपट्रोनिक गिअरबॉक्स
  • ग्रेफाईट ग्रे अ‍ॅलॉय व्हील, डॅम्पर कंट्रोलसह न्यू एस स्पोर्ट्‌स सस्पेंशन
  • स्पोर्ट मोडसह ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट प्लस
  • डायनॅमिक टर्न सिग्नलसह मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्स
  • इलेक्ट्रिक बूट लिड फंक्शनसह कम्फर्ट की
  • मायलेज १०.६ किलोमीटर प्रतिलिटर
  • कारची किंमत ७९.०६ लाख रुपये (एक्स-शोरूम)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Speed Test Video : ताशी १८० किमी वेग तरीही काठोकाठ भरलेल्या ग्लासांमधून एकही थेंब पाणी सांडले नाही...!

Alcohol Tree : ऐकू ते नवलच! 'या' 3 झाडांपासून बनते दारू...लाखो लोकांना आजही नाही माहिती

INDW vs SLW, 5th T20I: दीप्ती शर्माने नोंदवला मोठा विश्वविक्रम अन् भारतानेही रोमांचक विजयासह श्रीलंकेला दिला व्हाईटवॉश

Horoscope : उद्यापासून त्रिपुष्कर योगसह बुधादित्य राजयोग; कन्यासह 5 राशींना तिप्पट धनलाभ, नवं वर्ष सुरू होताच 3 मोठी कामं होणार पूर्ण

New Money Rules : क्रेडिट स्कोअर ते UPI – १ जानेवारी २०२६ पासून बदलणार ७ मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम?

SCROLL FOR NEXT