युथ्स-कॉर्नर

गप्पा ‘पोष्टी’ : आग का दरिया

प्रसाद शिरगावकर

हा आठवडा वर्षातला सर्वाधिक रोमँटिक आठवडा! विशेषतः प्रेमात असलेल्या, पडायच्या मार्गावर असलेल्या किंवा आकंठ बुडालेल्या अशा सगळ्यांसाठी नक्कीच! पूर्वी फक्त एक ‘व्हॅलेंटाइन्स डे’ साजरा केला जायचा, हल्ली मात्र रोज एक कुठला ना कुठला ‘डे’ असलेला व्हॅलेंटाइन्स सप्ताह साजरा केला जातो. अनेक जण हे सगळे दिवस काहीतरी ‘नवीन फॅड’ म्हणून सोडून देतात. काहीजण तर ‘व्हॅलेंटाइन्स डे’ हेच मोठं फॅड, खूळ वगैरे आहे म्हणून तोही साजरा करत नाहीत. ते सोडा, तुम्ही यातला कोणताही एक वा अनेक दिवस साजरे करत असल्यास तुम्ही अजूनही तरुण आहात! प्रेम करणारा प्रत्येक माणूस कायम तरुणच राहातो!

‘व्हॅलेंटाइन्स डे’ हा आपल्या जोडीदारावरच्या आपल्या प्रेमाचं सेलिब्रेशन करण्यासाठीचा दिवस. असं सेलिब्रेशन त्याच दिवशी करायचं नसल्यास नका करू, याच सुमारास येणाऱ्या वसंत पंचमीला करा किंवा महिन्याभराने येणाऱ्या रंगपंचमीला करा! दिवस निमित्त आहे केवळ, सेलिब्रेशन महत्त्वाचं आहे. तसं पाहिल्यास प्रेम असंख्य सिनेमे-कादंबऱ्यांमधून वापरून वापरून गुळगुळीत झालेली गोष्ट असली, तरी आपल्यावर वेळ येते तेव्हा ती अत्यंत टोकदार, हुरहुर लावणारी, एकाच वेळी अस्वस्थ आणि प्रफुल्लितही करणारी भावना असते. ही भावना ज्या व्यक्तीमुळं ंआपल्या हृदयात निर्माण होते तिला ती सांगणं हे या कोणत्याही एका दिवसाच्या निमित्तानं अवश्य करावं. जोडीदार निवडायचा असेल तरी करावं, निवडला असेल तरी करावं अन् जोडीदारासोबत अनेक वर्षे संसार करत असलो तरी करावं. विशेषतः, अनेक वर्षे संसार करत असल्यास हे आवर्जून करायचं. वर्षानुवर्ष एकत्र राहिलेली जोडपी एकमेकांना आणि एकमेकांवरच्या प्रेमाला गृहित धरायला लागतात अनेकदा. रोजच्या धावपळीत आणि धकाधकीच्या आयुष्यात, ‘मला तू अजूनही आवडतोस/आवडतेस आणि माझं तुझ्यावर अजूनही प्रेम आहे,’ हे एकमेकांना सांगितलंच जात नाही कधी. अशा एखाद्या दिवसाचं निमित्त करून ते सांगून टाकायचं. प्रेम व्यक्त करत राहायचं, प्रेम साजरं करत राहायचं.... 

खरंतर हे प्रेम वगैरे फारच छळणारी गोष्ट असते. मुळात जिच्यावर आपला जीव जडेल अशी व्यक्ती भेटणं हा निव्वळ योगायोग असतो. भेटलीच तर आपल्याला ती आवडते तसं तिला आपण आवडणं हे जमायला लागतं. दोघंही एकमेकांना आवडत असले तरी ते एकत्र येणं जमायला लागतं. एकत्र आलेच तर ते टिकून राहाणं जमायला लागतं. सगळाच साला आयुष्यभर असलेला योगायोगांचा अन् एकमेकांना सांभाळण्याचा खेळ. म्हणूनच हा इतका अवघड योग ज्यांच्या आयुष्यात आला आहे, त्यांनी तो जमेल तसा, जमेल तेव्हा भरभरून साजरा केला पाहिजे. कारण शेवटी, 

ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे
इक आग का दरिया है और डूब के जाना है

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT