Shivaji Maharaj soap history

 

esakal

Trending News

Shivaji Maharaj: साबणाचा शोध कसा लागला, शिवरायांच्या काळात साबण होते का?

Shivaji Maharaj soap history: साबणाचा शोध २३०० वर्षांपूर्वी लागला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही साबण अस्तित्वात होता व तो स्वच्छतेसाठी वापरला जात होता.

Sandip Kapde

साबणाचा इतिहास मानवजातीइतकाच प्राचीन आहे. संशोधनानुसार, साबणाचा शोध किमान २३०० वर्षांपूर्वी लागल्याचे मानले जाते. इ.स.पू. २८०० मध्ये बॅबिलोनियन लोकांनी प्रथमच साबण तयार करायला सुरुवात केली. यामध्ये नैसर्गिक सोडा आणि विविध वनस्पतींचा वापर केला जात असे.

नैसर्गिक घटक वापरून साबण तयार

ईजिप्तात देखील लोक नैसर्गिक घटक वापरून साबण तयार करत असत. फिनिशियन लोकांनी इ.स.पू. ६०० मध्ये साबणाचा शोध लावल्याचे मानले जाते. रोमन साम्राज्यात सॅपो नावाच्या मृत्तिकेपासून साबण तयार करत, स्वच्छतेला मोठे महत्त्व दिले जात असे. इ.स. १०० मध्ये गॉल लोक साबण वापरत होते. पाँपेई येथील उत्खननात २०२५ वर्षांपूर्वीचा साबण कारखाना आढळला होता.

स्वच्छतेसाठी त्याचे महत्त्व

ग्रीक वैद्य गेलेन यांनी साबणाचा औषधी उपयोग आणि शरीर स्वच्छतेसाठी त्याचे महत्त्व सांगितले. जर्मनीत १६७२ मध्ये ए. लिओ नावाच्या जर्मन गृहस्थाने इटलीहून साबण मागवला. सातव्या शतकात मार्सेली, जिनोआ, व्हेनिस आणि सॅव्होना हे प्रमुख साबणनिर्मिती केंद्र बनले. इंग्लंडमध्ये १२व्या शतकात साबण तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर अमेरिकेत १६०८ मध्ये जर्मन आणि पोलिश लोकांनी साबणनिर्मिती सुरु केली.

सोडा बनवण्याची नवीन पद्धत

१७९१ मध्ये नीकॉला लब्लां यांनी मिठापासून धुण्याचा सोडा बनवण्याची नवीन पद्धत शोधली. १९व्या शतकात साबण उद्योग वैज्ञानिक पद्धतींवर आधारित झाला आणि युस्टुस फोन लीबिक यांच्या मते, एखाद्या देशाचा संपन्नपणा साबणाच्या वापरावरून दिसतो.

शिवाजी महाराजांच्या काळात साबण होते?

भारताच्या संदर्भात पाहता, साबण अरबस्थान किंवा इराणमधून येत असल्याचे उल्लेख आढळतात. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात पाणी आणि साबणाचा जीवनाशी संबंध जोडला आहे. त्यांनी म्हटले आहे, “नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, तुका म्हणे जीवने विण, पिक नव्हे नव्हे जाण.” या अभंगानुसार, जीवन म्हणजे पाणी होय. जर पाणी स्वच्छ नसेल तर साबण निष्प्रभ ठरतो आणि पिकही येत नाही. (संदर्भ – संत तुकाराम महाराज आणि मराठी विश्वकोष)

यावरून असे निष्कर्ष निघतो की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात साबण अस्तित्वात होता आणि लोक त्याचा वापर स्वच्छतेसाठी करत असत. त्या काळातील स्वच्छता, औषधी वापर आणि जीवनशैलीवरून हे दिसून येते की, साबण फक्त शरीर स्वच्छतेसाठी नव्हे तर आरोग्यासाठीही महत्त्वाचा होता.

आजही साबण आपले जीवनशैलीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. प्राचीन काळातील या शोधामुळे आधुनिक विज्ञान आणि साबणनिर्मिती उद्योगाची पायभरणी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वच्छतेच्या पद्धती आपल्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून समजून घेता येतात.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT