Adani Group : गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान; अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा कोसळले, 'या' कंपन्यांना बसला फटका

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशीही अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
Adani Group
Adani GroupSakal

Adani Group Stocks Crash : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशीही अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. ज्या चार शेअर्समध्ये सर्किट नाही ते देखील घसरणीसह व्यवहार करत आहेत.

अदानी समूहाचे शेअर्स पुन्हा घसरले :

अदानी समूहाच्या समभागांवर नजर टाकली तर, अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक 8 टक्क्यांनी घसरला आहे आणि तो रु. 1702 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

अदानी ग्रीन 5% घसरून 688 रुपयांवर, अदानी विल्मर 5% घसरून 414 रुपयांवर, अदानी ट्रान्समिशन 5% घसरून 1127 रुपयांवर, अदानी पॉवर 5% घसरून156 रुपयांवर, अदानी टोटल गॅस 5% घसरून 1192 रुपयांवर.

Adani Group
Mukesh Ambani : मुकेश अंबानींची मोठी डील; कापड क्षेत्रातील 'ही' कंपनी घेतली विकत, गुंतवणूकदारांना...

अदानी पोर्ट्स 7% घसरून 543 रुपयांवर, ACC 4.20 टक्क्यांनी घसरून 1801 रुपयांवर, अंबुजा सिमेंट 6.35 टक्क्यांनी घसरून 338 रुपयांवर आणि NDTV 5 टक्क्यांनी घसरून 198 रुपयांवर आला.

अदानी समूहाचे शेअर्स का पडले?

रेटिंग एजन्सी मूडीजने अदानी समूहाच्या कंपन्यांचे क्रेडिट आउटलुक कमी केले आहे, त्यामुळे अदानी समूहाच्या समभागात घसरण झाली आहे.

BSE India
BSE IndiaSakal

कंपनीच्या बाँड पोर्टफोलिओमध्ये मोठ्या प्रमाणात तोटा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अदानी समूहाच्या शेअर्सवर हा दबाव दिसून येत आहे. शुक्रवारी, मूडीजने अदानी समूहाच्या आठ कंपन्यांचे मानांकन कमी केले आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

अदानी समूहाच्या महसुलाच्या कपात?

अदानी समूहाने महसूल वाढीचे लक्ष्य कमी केल्याने बाजाराचीही निराशा झाली आहे आणि त्यासोबत समूह भांडवली खर्च कमी करणार आहे. अदानी समूहाने आता पुढील आर्थिक वर्ष 2023-24 साठी 15-20 टक्के महसूल वाढीचे लक्ष्य ठेवले आहे.

समूहाच्या भांडवली खर्चाच्या योजनेवर म्हणजेच कंपन्यांच्या विस्तार योजनेवर होणारा खर्च कमी करेल. आता समूहाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यावर कंपनीचे लक्ष असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com