
Bank Holidays: मे महिन्यात बँका ११ दिवस बंद; आर्थिक कामांचं करा योग्य नियोजन, वाचा यादी
Bank Holiday in May 2022: येत्या मे महिन्यात तुम्ही बँकांशी संबंधित काही महत्त्वाची कामं करण्याचे नियोजन केलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. येत्या मे महिन्यात तुम्हाला आर्थिक कामांचं व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागणार आहे, कारण मे महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मे महिन्याचे सुट्टीचे कॅलेंडर जाहीर केले आहे. त्यानुसार मे महिन्यात रमजान ईद, बुद्ध पौर्णिमा, भगवान श्री परशुराम जयंती तसेच शनिवार, रविवारच्या सुट्ट्यांमुळे बँका तब्बल ११ दिवस बंद राहणार आहेत. यामुळे बँकेच्या कामकाजाची तारीख पाहूनच आर्थिक कामांचे नियोजन करावे.
या दिवशी बँकांना असेल सुट्टी:
१ मे : रविवार
२ मे : रमजान-ईद
३ मे : भगवान श्री परशुराम जयंती, रमजान-ईद, बसव जयंती, अक्षय तृतीया
८ मे : रविवार
९ मे : रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन (बंगालमध्ये बँका बंद)
१४ मे : शनिवार
१५ मे : रविवार
१६ मे : बुद्ध पौर्णिमा
२२ मे : रविवार
२८ मे : शनिवार
२९ मे : रविवार
मे महिन्यात वरील ११ दिवस देशभरात बँका बंद राहणार आहेत. दुसरा आणि चौथा शनिवार बँकांना सुट्टी असते, तर इतर दिवशी सण असल्याने बँका बंद असतील. १ मे रविवार, २ मे रमजान ईद आणि ३ मे रोजी अक्षय तृतीया असल्याने बँका सलग ३ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांच्या सुट्टीचं वेळापत्रक समोर ठेवूनच आर्थिक कामांचे नियोजन करावे. त्यामुळे बँक ग्राहकांनी बँकेतील कामाचे तसे नियोजन करणे आवश्यक आहे