जागतिक अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे लक्षण: मॉर्गन स्टॅन्ले

पीटीआय
Tuesday, 16 June 2020

जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होते आहे, असे मॉर्गन स्टॅन्लेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. चौथ्या तिमाहीपर्यंत अर्थव्यवस्था कोरोना काळाच्या आधीच्या पातळीवर पोचेल अशी शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होते आहे, असे मॉर्गन स्टॅन्लेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. चौथ्या तिमाहीपर्यंत अर्थव्यवस्था कोरोना काळाच्या आधीच्या पातळीवर पोचेल अशी शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मॉर्गन स्टॅन्लेचे अर्थतज्ज्ञ चेतन आह्या म्हणाले की, अर्थव्यवस्था "V' आकाराची सुधारणा दर्शवत असून नुकताच प्रसिद्ध झालेली आकडेवारी देखील आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे दर्शवत आहे. आर्थिक सुधारणांसाठी उचलण्यात आलेल्या पाऊलांमुळे आर्थिक धोरणे यशस्वी होत असल्याचे चित्र दिसते आहे.

'जिओ'मध्ये होणार आणखी एक गुंतवणूक, सौदी अरेबियन कंपनीकडून होण्याची शक्यता

लहान मंदी येण्याचे लक्षण असून दुसऱ्या तिमाहीत वार्षिक आधारावर जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर -8.6 टक्के राहण्याची शक्यता आहे. वर्ष 2021 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 3 टक्क्यांवर पोचेल असा अंदाज मॉर्गन स्टॅन्लेने वर्तविला आहे.

मे महिन्यात भारताच्या निर्यातीत घट

1.मागणी आणि पुरवठा साखळीमध्ये निर्माण झालेल्या असंतुलनामुळे मंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ही परिस्थिती दीर्घकाळ टिकणारी नाही.

2. मालमत्ता विकून कर्ज फेडण्याचा दबाव मध्यमवर्गीय लोकांवर अधिक राहण्याची शक्यता आहे.

3.आर्थिक धोरणे अर्थव्यवस्थेला बूस्ट करण्यास उपयोगी ठरणार असून यामुळे जलद सुधारणा होईल.

घसरणीनंतर शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल; सेन्सेक्समध्ये ३५९ अंशांची वाढ

जगभरातील देशांमध्ये त्या त्या देशातील सरकारांकडून विविध उपाययोजना सुरूच राहतील. जगभरातील अर्थ मंत्रालय आणि मध्यवर्ती बँका अर्थव्यवस्थेत तरलता (लिक्विडीटी) टिकवून ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये पैसे ओतण्याचे कार्य सुरूच ठेवतील. शिवाय कोरोनावरील औषध सापडण्यावर देखील बरीच परिस्थिती अवलंबून असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

लॉकडाऊनच्या काळात तुम्हीही काढू शकता तुमच्या पीएफ खात्यातील पैसे ! कसे ते घ्या जाणून...

कोरोनाची दुसरी साथ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काही ठिकाणी लॉकडाऊनची स्थिती निर्माण होऊ शकते. शिवाय कोरोना संसर्ग कमी न झाल्यास आणखी रुद्र रूप देखील धारण करण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. परिणामी जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे देखील मॉर्गन स्टॅन्लेच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Global economy is getting back on track Morgan Stanley