सोने चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर | Gold Silver Price Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Todays Gold Silver Update

सोने चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Today's Gold Silver Price update: आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या भावात चढउतार सुरू आहे. शुक्रवारी सोने-चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती मात्र आज सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. (Gold silver update 16 july 2022)

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,500 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,730 रुपये आहे तर आजही चांदीचे दर वाढले असून 10 ग्रॅम चांदीचा दर 550 रुपये आहे. (Todays Gold, Silver price Updates)

हेही वाचा: Bonds VS FD Return : असा मिळवा एफडीपेक्षा जास्त परतावा सरकारी हमीसह

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - रुपये

दिल्ली - 50,580 रुपये

हैदराबाद - 50,730 रुपये

कोलकत्ता - 50,730 रुपये

लखनऊ - 50,890 रुपये

मुंबई - 50,730 रुपये

नागपूर - 50,760 रुपये

पूणे - 50,760 रुपये

हेही वाचा: पंचाग 16 जुलै : काळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा: नव्या अटींमुळे वाढणार करदात्यांची संख्या

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

Web Title: Gold Silver Price Update 16 July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top