सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव स्थिर; चांदीच्या दरात घसरण कायम, जाणून घ्या आजचे दर

आजही सोन्याचे दर स्थिर असून तर चांदीचे दरही मात्र घसरले.
Today's Gold Silver Price
Today's Gold Silver PriceSakal

Gold silver price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली. आजही सोन्याचे दर स्थिर असून तर चांदीचे दरही मात्र घसरले. (Gold silver update) आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,900 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,160 रुपये आहे तर10 ग्रॅम चांदीचा दर 549 रुपये आहे. (Gold silver price update 26 july 2022)

Today's Gold Silver Price
Gold-Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदी महाग, जाणून घ्या आजचे दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 51,490 रुपये

दिल्ली - 51,160 रुपये

हैदराबाद - 51,160 रुपये

कोलकत्ता - 51,160 रुपये

लखनऊ - 51,330 रुपये

मुंबई - 51,160 रुपये

नागपूर - 51,190 रुपये

पूणे - 51,190 रुपये

Today's Gold Silver Price
Gold-Silver Price: सोने-चांदीचे दर आजही स्थिर; खरेदीची उत्तम वेळ

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Today's Gold Silver Price
Gold-silver Price: सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com