Gold-Silver Price: ऐन नवरात्रीत सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर| Gold Silver Price Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold

Gold-Silver Price: ऐन नवरात्रीत सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. नवरात्रीत सोने चांदीचे दर अचानक घसरल्याने सोने खरेदी करणाऱ्यांकडे कल दिसून येत आहे. बुधवारीसुद्धा सोने चांदीचे दर घसरलेले दिसून आले मात्र आज सोन्याचा भाव स्थिर दिसून येत असून चांदीचा दरात कपात झाली आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,800 रुपये तर 24 कॅरेट साठी 49,970 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 550 रुपये आहे. (gold silver price update 28 september 2022)

हेही वाचा: Gold Smuggling : देशभरात 'गोल्ड रश' कारवाई, फक्त मुंबईतच कोट्यवधींची गोल्ड बिस्कीटं जप्त

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 50,450 रुपये

दिल्ली - 50,130 रुपये

हैदराबाद - 49,970 रुपये

कोलकत्ता - 49,970 रुपये

लखनऊ - 50,130 रुपये

मुंबई - 49,970 रुपये

नागपूर - 50,000 रुपये

पूणे - 50,000 रुपये

हेही वाचा: Gold Silver Price: सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हेही वाचा: Gold Jewellery : कंबरेच्या खाली सोन्याचे दागिने का घालत नाहीत? जाणून घ्या कारण

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते