सोन्याचा भाव स्थिर तर चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्याचे भाव स्थिर दिसून येत आहे.
Todays Gold Silver Price Update
Todays Gold Silver Price UpdateSakal

गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली होती. मात्र या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्याचे भाव स्थिर दिसून येत आहे. सोमवारला सोन्याच्या दरात कोणताही बदल दिसून आला नव्हता तर आजही सोन्याचे भाव स्थिर असून सोन्याच्या भावात कोणताही बदल नाही तर या तुलनेत आज चांदीचे दर मात्र घसरले. (Gold silver update 14 june 2022)

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,360 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,760 रुपये आहे तर चांदीच्या दर आज 10 ग्रॅम चांदी 615 रूपये आहे.

Todays Gold Silver Price Update
IRCTC शेअर्समध्ये घसरण, आता गुंतवणूक करावी का?

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 52,830 रुपये

दिल्ली - 52,760 रुपये

हैदराबाद -52,760 रुपये

कोलकत्ता - 52,760 रुपये

लखनऊ - 52,910 रुपये

मुंबई - 52,760 रुपये

नागपूर - 52,810 रुपये

पूणे - 52,810 रुपये

Todays Gold Silver Price Update
गुंतवणूकदारांना सात लाख कोटींचा दणका

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Todays Gold Silver Price Update
IRCTC शेअर्समध्ये घसरण, आता गुंतवणूक करावी का?

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com