Share Market: 'या' 3 शेअर्समध्ये मिळेल लाखोंची कमाई... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market: 'या' 3 शेअर्समध्ये मिळेल लाखोंची कमाई...

तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा कमावायचा असेल तर तुम्हाला चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे. त्यामुळेच शेअर बाजार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. आयआयएफएल सिक्युरीटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी 3 मजबूत स्टॉक्सची लिस्ट घेऊन आले आहेत. या शेअर्समध्ये पैसे गुंतवून तुम्हाला चांगला नफा कमावता येईल. जाणून घेऊयात भसीन यांनी कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवायला सांगितले आहेत.

तज्ज्ञांनी अल्ट्राटेक सिमेंट स्टर्लिंगच्या ( UltraTech Cement Sterling) शेअर्सवर बाय रेटींग दिले आहे. दुसऱ्या शेअरसाठी त्यांनी इंटरग्लोब एव्हिएशनची (InterGlobe Aviation) निवड केली आहे. तिसऱ्या शेअरसाठी त्यांनी स्टर्लिंग आणि विल्सनवर (Sterling & Wilson) विश्वास व्यक्त केला आहे.

अल्ट्राटेक सिमेंट स्टर्लिंगच्या ( UltraTech Cement Sterling)

सीएमपी (CMP) - 6185 रुपये

टारगेट (Target) - 6540/6570 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 6000 रुपये

हेही वाचा: Share Market : हे 3 शेअर्स तुमचा पोर्टफोलिओ बनवतील दमदार

इंटरग्लोब एव्हिएशनची (InterGlobe Aviation)

सीएमपी (CMP) - 1847.10 रुपये

टारगेट (Target) - 2000/2050 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 1800 रुपये

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 337 तर निफ्टी 89 अंकांनी घसरला

स्टर्लिंग आणि विल्सनवर (Sterling & Wilson)

सीएमपी (CMP) - 331 रुपये

टारगेट (Target) - 500 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 450 रुपये

हेही वाचा: Share Market : शेअर बाजाराच्या घसरणीदरम्यान 'हा' शेअर देईल चांगला परतावा

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा