Investment Platform : सोनं, FD की शेअर बाझार, इथं पैसा गुंतवाल तर करोडपती व्हाल

सोन्यात गुंतवणूक करण्याचा नवा ट्रेंड, पण शेअर मार्केटही चांगला ऑप्शन? नक्की काय करायचं
Investment Platform
Investment Platformesakal

Investment Platform : बाजारातील गुंतवणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहे. गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असल्यामुळे पैशांच्या गुंतवणुकीचे निर्णय घेणे एक मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. सोन्याची पारंपरिक झळाळी कायम असली तरी शेअर बाजार आणि एफडी देखील एक आकर्षक गुंतवणुकीची संधी म्हणून आपले स्थान टिकवून आहेत.

गुंतवणुकीत कर्जरोखे, म्युच्युअल फंड्स, रिअल इस्टेट, कमॉडिटीज यांचा समावेश असून ही यादी वाढत जाते. या सगळ्यात महत्त्वाचा मुददा असा येतो की, गुंतवणूक कशामध्ये करावी.

Investment Platform
Foxconn Investment In India: महाराष्ट्रातून गेलेली कंपनी कर्नाटकात करणार ६,००० कोटींची गुंतवणूक

तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय, तुमच्या बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. तुमची बचत योग्य ठिकाणी गुंतवली असेल तर बंपर रिटर्न मिळणेही निश्चित आहे. लोक अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काहीजण सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, तर काही बँक एफडीमध्ये पैसे जमा करतात.

काही लोकांना लिक्विड फंड आवडतात.  परंतु कोणता फंड सर्वांत चांगला परतावा देतो. त्यानुसार गुंतवणूकदारांनी त्यांचा पोर्टफोलिओ तयार करावा. एक चांगला पोर्टफोलिओ म्हणजे विविध उत्पादनांमध्ये केलेली गुंतवणूक होय. यामध्ये गुंतवणूकदाराला जोखीम घटक, तरलता, कर आणि लॉक-इन नियमांची माहिती असणे देखील आवश्यक आहे. त्याबद्दलच आज जाणून घेऊयात.

Investment Platform
Investment in Maharashtra : रायगडमध्ये येणार १०,५०० कोटींची गुंतवणूक! फडणवीसांनी केली घोषणा

गुंतवणुकीच्या परताव्याचा ही माहिती 20 मार्च 2023 ची आहे. येथे Gold वरील परतावा देशांतर्गत किमतींवर आधारित असतो. रोख म्हणजे लिक्विड फंड श्रेणीतील सरासरी परतावा. फिक्स्ड इन्कममध्ये SBI चे डिपॉझिटचे दर घेतले आहेत.  

मिंटच्या अहवालानूसार, एका वर्षातील गुंतवणुकीच्या रिटर्न्सवर गेल्या एका वर्षात Gold ने सर्वाधिक ११.३९ %रिटर्न दिला आहे. लिक्विड फंडांनी 5.36 %, FD 5.1 % आणि इक्विटीने 0.41 % दिले आहेत.  

Investment Platform
Investment Tips : भरपूर पैसे गुंतवूनही मिळत नाहीये पुरेसा नफा ? मग तुमचं काहीतरी चुकतंय

5 वर्षांच्या गुंतवणुकीवर रिटर्न

Goldने गेल्या पाच वर्षांतील गुंतवणुकीवर सर्वाधिक 12.85 % परतावा दिला आहे. इक्विटीमध्ये 11.8 %, एफडीमध्ये 6.4 %, लिक्विड फंडमध्ये 5.09 %.

10 वर्षांच्या गुंतवणुकीवर रिटर्न

गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक परतावा इक्विटीमध्ये (सेन्सेक्स) 11.8 % आहे. एफडीमध्ये 8.75 %, लिक्विड फंडमध्ये 6.56 % आणि एफडीवर 8.75 % इतका परतावा मिळाला आहे.

Investment Platform
Investment Plan : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'या' 8 योजनांमध्ये करा गुंतवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com