Investment Tips : तुमच्याकडे असलेल्या पैशांची गुंतवणूक कशी कराल ; जाणून घ्या कुठे मिळेल बेस्ट रिटर्न्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Investment Tips : तुमच्याकडे असलेल्या पैशांची गुंतवणूक कशी कराल ; जाणून घ्या कुठे मिळेल बेस्ट रिटर्न्स

Investment Tips : तुमच्याकडे असलेल्या पैशांची गुंतवणूक कशी कराल ; जाणून घ्या कुठे मिळेल बेस्ट रिटर्न्स

Investment Tips : नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून महिनाखर्च भागत नाही. तेव्हा एखादा जोडधंदा असावा असे वाटते. पण, ते शक्य नसते. त्यामुळे लोक गुंतवणूकीतून पैसा कमावण्याचा विचार करतात. सहसा लोक एफडीमध्ये पैसे गुंतवतात. ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पण आजच्या काळात तुमच्याकडे एफडी व्यतिरिक्त अनेक पर्याय आहेत. जेथे तुम्ही गुंतवणूक करून अधिक फायदा मिळवू शकता.

हेही वाचा: Investment Tips : ज्येष्ठ नागरिकांनी ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मिळेल जास्त परतावा

लोकांना गुंतवणुकीचे पर्याय माहिती आहेत पण त्यात असलेल्या जोखीमीमुळे गुंतवणूक करायला घाबरतात. कोरोनानंतर लोकांमध्ये गुंतवणुकीबाबत सतर्कता वाढली आहे. नुकताच जागतिक बचत दिन पार पडला. त्याच पार्शभुमीवर गुंतवणूक कशी करावी?, कुठे करावी, त्यातून फायदा किती होईल या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा: Investment Tips : ज्येष्ठ नागरिकांनी ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मिळेल जास्त परतावा

गुंतवणुकीचे फायदे काय आहेत

गुंतवणूक केल्याने अनावश्यक खर्च टाळता येतो. गुंतवणूक योग्य वेळी केली तर भविष्यात आपण मोठी स्वप्न पूर्ण करता येतात. गुंतवणूक करताना ती योग्यवेळी केल्यास भविष्य आनंदी अणि सुरक्षित होईल. आपल्या आणि आपल्या मुलांच्या पुढील शिक्षण,व्यवसाय, तसेच सुखी कुटुंबासाठी आपल्याला गुंतवणुकीमुळे मदत होते. गुंतवणुकीमुळे आर्थिक बचत करण्याची सवय लागते.

हेही वाचा: Investment Tips : इक्विटी, बाँड की म्युच्युअल फंड?; कोणती गुंतवणूक फायदेशीर

रियल एस्टेट इंवेस्टमेंट ट्रस्ट

तुमच्याकडे 5 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम असेल. आणि ती तूम्ही ती गुंतवण्याचा विचार करत असाल तर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) हा बेस्ट ऑप्शन आहे. ही म्युच्युअल फंडसारखीच गुंतवणूक असून यामध्ये प्रॉपर्टीवर तूमचे पैसे गुंतवू शकता. यामध्ये सर्वसामान्य लोकांकडून पैसे घेऊन मॉल्स, पार्क अशा मोठ्या मालमत्ता खरेदी केल्या जातात.

हेही वाचा: Investment Tips: 100 रुपयांपासून सुरु करा SIP आणि मिळवा उत्तम परतावा

कशी कराल गुंतवणूक

REIT मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुमच्याकडे फक्त डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते असणे आवश्यक आहे. गुंतवणुकदार म्हणून तुम्हाला लाभांश आणि आरईआयटीच्या वाढीव किमतीच्या रूपात कमाई होईल. ही गुंतवणूक करताना तूम्हाला खात्री असलेल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करा एकदा तुम्ही पाहिले की मूळ मालमत्ता चांगली असली पाहिजे, तरच तुम्हाला फायदा मिळेल.

हेही वाचा: Investment Tips: 100 रुपयांपासून सुरु करा SIP आणि मिळवा उत्तम परतावा

इंडेक्‍स फंड्स

इक्विटी म्युच्युअल फंडावर आधारित अप्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग म्हणजे इंडेक्स फंड होय. इंडेक्स फंड हे गुंतवणुकीचे उत्तम साधन आहे. जास्त जोखीम उचलण्याची तयारी नसेल, तर इंडेक्स फंड एक चांगला पर्याय आहे. एखाद्या निर्देशांकातील समभागात गुंतवणूक करून एकाच निर्देशांकावर भर देण्यात येतो.

हेही वाचा: Mutual Funds Investment Tips: हवाय जास्त परतावा? 'या' टिप्स करा फॉलो

समजा एखाद्या कंपनीचा निर्देशांकातील भार 10 टक्के आहे, तर इंडेक्स फंडातही त्या समभागाचा तेवढाच भार राहतो. जो बेंचमार्क आहे, त्या निर्देशांकाची बरोबरी साधणे हा या फंडाचा उद्देश असतो. इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही हाउस ऑफ फंड्सची अधिकृत वेबसाइट किंवा कोणतेही अॅप वापरू शकता.

हेही वाचा: Invest MP : राज्यातील गुंतवणूक आता MPमध्ये? शिवराजसिंह चौहान पुण्यात का?

सॉवरेन गोल्ड बाँड

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा एकच ऑप्शन सध्या लोकांना माहिती आहे. तो म्हणजे सणासुदीच्या मुहूर्तावर सोने घेणे. गुंतवणुकीवर लोकांना फायदे मिळावेत यासाठी केंद्र सरकारची गोल्ड कमाई योजनेंतर्गत सॉवरेन गोल्ड बाँड योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत लोक त्यांचे पैसे सोन्यात गुंतवू शकतात. गोल्ड बाँड योजना ही गोल्ड कमॉडिटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.

हेही वाचा: Investment : फ्रीडम एसआयपीद्वारे वृद्धापकाळ बनवा स्वावलंबी

या गुंतवणूक मार्गाचा लॉक इन कालावधी 8 वर्षांचा आहे. 8 वर्षांनंतर पैसे काढण्यावर कोणताही भांडवली कर नाही. यामध्ये गुंतवणूकदाराला वार्षिक 2.5% व्याज मिळते. यामध्ये आठ वर्षांत गुंतवलेल्या रकमेवर २०% व्याज मिळू शकते. पैसे काढल्यावर, सोन्याच्या बाजारभावाच्या आधारे पेमेंट केले जाते. यामध्ये तुम्हाला सोन्याच्या वाढच्या किमतीचा फायदा होऊ शकतो.