कंस्ट्रक्शन कंपनीचा 'हा' शेअर करेल तुम्हाला मालामाल, तज्ज्ञांना विश्वास...| PSP Project Stocks | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PSP Projects Stocks
कंस्ट्रक्शन कंपनीचा 'हा' शेअर करेल तुम्हाला मालामाल, तज्ज्ञांना विश्वास...| PSP Project Stocks

कंस्ट्रक्शन कंपनीचा 'हा' शेअर करेल तुम्हाला मालामाल, तज्ज्ञांना विश्वास...

PSP Projects Stocks: शेअर बाजारात (Share Market) सध्या अनिश्चिततेचं वातावरण आहे, आणि त्यामुळेच आता केलेली शेअर्सची खरेदी तुम्हाला येत्या काळात भरघोस नफा देऊ शकते. अनेक लिस्टेड कंपन्यांनी सध्या त्यांचे तिमाही निकाल सादर केलेत, आणि त्यामुळेच त्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. अशातच शेअर बाजारात तुम्ही चांगल्या शेअर्समध्ये (Stocks) पैसे गुंतवल्यास येत्या काळात तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी तुमच्यासाठी एक दमदार शेअरची निवड केली आहे. त्यांनी कंस्ट्रक्शन कंपनीच्या पीएसपी प्रोजेक्ट्समध्ये (PSP Projects) पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. ही कंपनी रिअल इस्टेट आणि कंस्ट्रक्शनमध्ये खुप चांगले प्रदर्शन करत असल्याचे संदीप जैन यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: 'हा' मल्टीबॅगर स्टॉक फक्त एका महिन्यात 40% वाढला, आणखी तेजी येण्याची शक्यता

PSP Projects मध्ये का करावी खरेदी?
पीएसपी प्रोजेक्ट्स (PSP Projects) सरकारी प्रोजेक्टही करत आहे. अशात आता या शेअरमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचा सौदा ठरेल असे संदीप जैन यांचे म्हणणे आहे.

पीएसपी प्रोजेक्ट्स (PSP Projects)-
सीएमपी (CMP) - 564.25 रुपये
टारगेट (Target) - 630 रुपये

हेही वाचा: महिंद्रा अँड महिंद्राचे (M&M) शेअर्स करणार मालामाल; 72 टक्के वाढीचा तज्ञांचा अंदाज

कंपनीचे फंडामेंटल्स ?
कंपनीचे शेअर्स 12 च्या पीई मल्टीपल पर ट्रेड करत आहेत. कंपनीचा डिव्हिडेंड यील्ड 1 टक्क्याच्या जवळपास आहे. रिटर्न ऑन इक्विटी 16-17 टक्के आहे. डिसेंबर 2020 मध्ये कंपनीने 28 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता. तर डिसेबंर 2021 मध्ये 47 कोटी रुपयांचा नफा सादर केला. कंपनीची व्हॅल्युएशन 1900 कोटी रुपये आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Market Expert Suggested Investing Money In Construction Companys Psp Projects

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top