Pepperfry चा IPO येण्याची शक्यता; जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pepperfry IPO:
Pepperfry चा IPO येण्याची शक्यता; जाणून घ्या सविस्तर

Pepperfry चा IPO येण्याची शक्यता; जाणून घ्या सविस्तर

Pepperfry IPO: फर्निचर आणि घरगुती उत्पादने ऑनलाइन विकणाऱ्या पेपरफ्रायने आयपीओ (IPO) आणण्याची तयारी केल्याचे समजते आहे. Pepperfry ने या IPO साठी तीन गुंतवणूक बँकर्सची नियुक्ती केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. पेपरफ्रायने ICICI सिक्युरिटीज, अ‍ॅक्सिस कॅपिटल आणि जेपी मॉर्गन यांची प्रस्तावित IPO साठी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे आणि रेड हेरंड प्रॉस्पेक्टसवर (DRHP) काम सुरु केले आहे.

पेपरफ्राय, अ‍ॅक्सिस कॅपिटल आणि जेपी मॉर्गनसह आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यावर अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही. आम्ही मनिकंट्रोलच्या हवाल्याने ही माहिती देत आहोत.

हेही वाचा: ईमुद्रा लिमिटेडचा IPO आज होणार खुला, पैसे गुंतवण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या...

कंपनी जूनच्या अखेरीला बाजार नियामक सेबीकडे DRHP जमा करू शकते असे सूत्रांकडून समजते आहे. या IPO मधून पेपरफ्राय सुमारे 1,900 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. यामध्ये, फ्रेश शेअर्सव्यतिरिक्त, काही भाग प्रमोटर्स आणि भागधारकांच्या शेअर्सचाही असेल. सध्याचे गुंतवणूकदार किती शेअर्स विक्रीसाठी ठेवतील त्यानुसार IPO ची साईज बदलू शकते, असे सूत्राने सांगितले.

हा आयपीओ कंपनीला तिच्या विस्तारासाठी भांडवल उभारण्यास मदत करेल, तसेच काही गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडण्याची संधी देईल असे सुत्रांकडून समजते आहे. Pepperfry च्या मुख्य गुंतवणूकदारांमध्ये नॉर्वेस्ट व्हेंचर्स, ब्रॉडस्ट्रीट इन्व्हेस्टमेंट्स, जनरल इलेक्ट्रिक पेन्शन ट्रस्ट आणि बर्टेल्समन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने फेविकॉल ब्रँडची लोकप्रिय कंपनी, पिडलाइट इंडस्ट्रीजकडून फेब्रुवारी 2022 मध्ये सुमारे 4 कोटी जमा केले होते.

हेही वाचा: म्युच्युअल फंडात 100 रुपयांसह सुरु करा गुंतवणूक, देईल चांगला परतावा...

Pepperfry ची सुरुवात ईबेचे (eBay) माजी अधिकारी अंबरीश मूर्ती आणि आशिष शाह यांनी 2012 मध्ये केली होती. त्याच्या वेबसाइटनुसार, 500 शहरांमध्ये 1.2 लाखांहून अधिक उत्पादने आणि 60 लाखांहून अधिक रजिस्टर्ड यूझर्स आहेत. 1.2 कोटी पेक्षा जास्त मंथली युझर्स कंपनीच्या वेबसाइटला भेट देतात. देशभरात 40 हून अधिक पेपरफ्राय एक्सपिरियन्स स्टोअर्स आणि 17 फुलफिलमेंट हब आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Pepperfry Ipo Which Sells Furniture And Home Appliances Online Is To Be Preparing For An Ipo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top