
खिशाला लागणार कात्री? आजपासून आर्थिक व्यवहारात होणार 'हे' सात बदल
आर्थिक व्यवहारांशी संबंधित सात नियम १ जुलैपासून म्हणजेच शुक्रवारपासून बदलत आहेत. यामध्ये क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवरील टीडीएस, आधार-पॅन कार्ड लिंकेज आणि डीमॅट केवायसी इत्यादींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, गॅसच्या किमतींमध्ये सुधारणा आणि इतर अनेक बदल देखील होऊ शकतात. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. यातील महत्त्वाचे सात बदल आज आपण जाणून घेणार आहोत. (seven important changes related to financial transactions from 1 july 2022)
हेही वाचा: आठवडाभर शेअर बाजारात अस्थिरता, शेवटच्या दिवशीही पडझड कायम
आधार कार्ड-पॅन लिंकवर 1,000 खर्च
आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आता 1000 रुपये खर्च करावे लागणार. मार्चपर्यंत मोफत होते मात्र त्यानंतर 500 रुपये झाले. सोबतच मार्च २०२३ पर्यंत पॅन लिंक न केल्यास ते निष्क्रिय होणार आहे. आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही स्वतः आधार कार्ड-पॅन लिंक करू शकता.
डीमॅट खाते निष्क्रिय केले जाईल
तुम्ही ३० जूनपर्यंत डीमॅट खात्याचे केवायसी केले नसेल तर ते आता निष्क्रिय होणार. म्हणजेच तुम्ही शेअर बाजारात खरेदी-विक्री करू शकणार नाही. तुम्ही शेअर विकत घेतला तरी तो तुमच्या खात्यात ट्रान्सफर होणार नाही. केवायसी पूर्ण झाल्यानंतरच हे ही प्रकिया पुर्ण होणार.
हेही वाचा: एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी घट, पण सर्वसामान्यांना दिलासा नाहीच!
दुचाकी आणि एसी महागणार
१ जुलैपासून दुचाकींच्या किमती वाढणार आहेत. Hero Moto Corp ची 3,000 रुपयांपर्यंत किंमत वाढवणार आहे तर इतर कंपन्याही किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. 5 स्टार एसी देखील 10 टक्क्यांनी महाग होणार आहे.
आता क्रिप्टोकरन्सीवर एक टक्का टीडीएस
१ जुलैपासून क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवर एक टक्का टीडीएस भरावा लागेल. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, यामध्ये सर्व प्रकारच्या NFT आणि डिजिटल चलनांचा समावेश असेल. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली.
हेही वाचा: Bharti Airtel च्या शेअर्समध्ये 34% वाढ अपेक्षित...
डेबिट कार्डला आरबीआयची मान्यता नाही
आता बँका कोणत्याही ग्राहकाला त्यांच्या बोर्डाच्या मान्यतेनेच डेबिट कार्ड जारी करू शकतात. यासाठी आरबीआयच्या परवानगीची गरज भासणार नाही. डेबिट कार्ड फक्त बचत आणि चालू खाते असलेल्या ग्राहकांना दिले जाईल. बँक कोणालाही जबरदस्तीने डेबिट कार्ड देऊ शकत नाही.
क्रेडिट कार्ड न देण्याचे कारण
१ जुलैपासून बँका किंवा वित्तीय कंपन्यांना ग्राहकाच्या अर्जावर क्रेडिट कार्ड का दिले नाही, हे स्पष्ट करावे लागेल. यासोबतच पर्यायाने विमा संरक्षणही द्यावे लागणार आहे. ग्राहकाच्या मान्यतेशिवाय कार्ड अपग्रेड करता येत नाही. चूक झाल्यास, कार्ड जारी करणाऱ्याला केवळ शुल्क परत करावे लागणार नाही, तर दंडही भरावा लागेल
भेटवस्तूवर 10% TDS
नवीन TDS नियमानुसार, आता दोन व्यावसायिक किंवा व्यावसायिक यांच्यातील अतिरिक्त नफ्याच्या व्यवहारावर वर्षभरात 20,000 पेक्षा जास्त नफ्यावर 10 टक्के TDS कापला जाईल. हे भेटवस्तू किंवा फायद्यांव्यतिरिक्त कार, प्लॅन टूर, चित्रपटाची तिकिटे इत्यादी असू शकते.
Web Title: Seven Important Changes Related To Financial Transactions From 1 July 2022 Check Here Details
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..