शेअर बाजारमध्ये पडझड कायम, सेन्सेक्स 280 अंकानी कोसळला

आज सकाळपासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत होती.
Share Market Latest News Updates
Share Market Latest News Updatessakal
Updated on: 

आज सकाळपासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत होती. आज सेन्सेक्स 280 अंकानी घसरत 54,100 वर बंद झाला तर निफ्टी 72 अंकानी घसरुन 16,167 वर बंद झाली. शेअर बाजारात घसरणीचे सत्र मागील आठवड्यापासून सुरु आहे.

आज सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 75.91अकांनी खाली घसरला होता तर निफ्टीने 16,230 वर सुरवात केली होती. शेअर बाजारात गेल्या दोन दिवसापासून अस्थिरता कायम आहे.

Share Market Latest News Updates
गुंतवणूकीची सुवर्णसंधी सोडू नका, ऐका तज्ज्ञांचा सल्ला...

मंगळवारीही शेअर बाजार घसरणीसह अर्थात लाल चिन्हात बंद झाला. संमिश्र जागतिक संकेतांमुळे एफएमसीजी आणि बँक वगळता सर्व सेक्टर्समध्ये विक्री दिसून आली. शेवटी, सेन्सेक्स 105.82 अंकांनी अर्थात 0.19 टक्क्यांनी घसरून 54,364.85 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 61.80 अंकांनी अर्थात 0.38 टक्क्यांनी घसरून 16,240.05 वर बंद झाला. (Share Market Todays Updates)

Share Market Latest News Updates
Delhivery IPO आजपासून गुंतवणूकीसाठी खुला, सब्सक्रिप्शन घ्यायचे का? एक्सपर्ट काय सांगतात पाहूयात

आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर मागील आठवड्यापासून सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र मागील आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसापासून शेअर बाजारात पडझड दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com