कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने बाजाराची घसरगुंडी

पीटीआय
Monday, 15 June 2020

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सकाळच्या सत्रात बाजार खुला होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 300 अंशांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 9 हजार 900 अंशांच्या खाली गेला.

निफ्टी 9 हजार 900 अंशांच्या खाली
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सकाळच्या सत्रात बाजार खुला होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 300 अंशांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 9 हजार 900 अंशांच्या खाली गेला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवसअखेर सेन्सेक्स 552 अंशांच्या घसरणीसह 33 हजार 228 पातळीवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 159 अंशांची घसरण झाली. तो 9 हजार 813 अंशांवर स्थिरावला. 

जागतिक पातळीवर चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी जागतिक पातळीवर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण आहे.

"टॅक्स' वाचवणारे चार मित्र

सेन्सेक्सच्या मंचावर  टेक महिंद्रा, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, मारुती, बजाज फायनान्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. सोमवारी झालेल्या पडझडीत गुंतवणूकदारांना सुमारे एक लाख कोटींचा फटका बसला आहे.

इंधन दरवाढीचा दणका सुरूच

चालू आठवड्यात शेअर बाजारातील आघाडीच्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल जाहीर होणार आहेत. परिणामी गुंतवणूकदारांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

भारतीय बाजारात ओतले 22, 840 कोटी
परदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) 1 ते 12 जून या कालावधीत देशांतर्गत शेअर बाजारांत 22 हजार 840 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. .

रिलायन्स राईट्स इश्यूचे बाजारात दणक्यात आगमन

जागतिक बाजार
चीनमध्ये नव्याने रुग्ण सापडल्याने त्याचे पडसाद आशियातील शेअर बाजारांवर उमटले. शांघाय, निक्केई आदी शेअर बाजारात घसरण झाली.

कच्चे तेल घटले
जागतिक बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत 2 टक्के घसरण झाली. तेलाचा भाव प्रती बॅरल 35.45 डॉलरपर्यंत खाली आला.

'ही' महत्त्वाची कामे करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले वाचा सविस्तर..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share market falls because of the fear of second wave of coronavirus