शेअर बाजारात आजही अस्थिरता? 'या' पाच मोठ्या शेअर्समध्ये घसरण

आठवड्याच्या सुरवातीपासून शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे
Share Market Update
Share Market Updateesakal

आठवड्याच्या सुरवातीपासून शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. शेअर बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसत आहे. बुधवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज मात्र पहिल्या सत्रात शेअर बाजारात हलकी तेजी दिसून येत आहे.

सेन्सेक्स 214अंकाच्या तेजीसह 53,728वर सुरू झाला तर निफ्टी 72 अंकाच्या तेजीसह 16,038 वर सुरू झाला. आजही शेअर अस्थिरता कायम आहे. केवळ 27 शेअर्समध्ये वाढ दिसत असून तब्बल २३ शेअर्समध्ये घसरण कायम आहे. विशेष म्हणजे HDFC, RELIANCE, TCS, COALINDIA, TATAMOTORS या पाच मोठ्या शेअर्समधील घसरण अधिक लक्षणीय आहे. त्यामुळे आज बाजारात थोडे तणावाचे वातावरण दिसून येणार.

Share Market Update
शेअर बाजारात आजही अस्थिरता? 'या' पाच मोठ्या शेअर्समध्ये घसरण

आयटी, गॅस आणि पॉवर शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळं शेअर बाजार (Share Market) बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. अमेरिकेतील (America) महागाईच्या आकडेवारीची भीतीही बाजारात दिसून आली. सेन्सेक्स 372.46 अंकांनी म्हणजेच 0.69 टक्क्यांनी घसरून 53, 514.15 वर बंद झाला. निफ्टी 91.60 अंकांनी म्हणजेच 0.57 टक्क्यांनी घसरून 15,966.70 वर बंद झाला.

इंडसइंड बँक (IndusInd Bank), एचडीएफसी (HDFC), भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले. डिव्हिस लॅब्स, जेएसडब्ल्यू स्टील, एचयूएल, सिप्ला आणि एशियन पेंट्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. सेक्टरल इंडेक्सचा विचार केल्यास निफ्टी एनर्जी इंडेक्स 1 टक्क्यांनी घसरला. एफएमसीजी, मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

Share Market Update
Share Market: तब्बल 42 शेअर्समध्ये घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका

देशांतर्गत स्टॉक मार्केटमधून सतत विदेशी कंपन्यांचं बाहेर पडत आहेत तसेच अमधूनमधून डॉलरच्या विक्रीचं प्रमाण वाढल्यानं त्याचा परिणाम रुपयाच्या अवमुल्यनावर झाला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येणार आहे.

Share Market Update
‘जीएसटी’वाढीमुळे महागाईचा चटका

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • डिविस लॅब (DIVISLAB)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  • सिप्ला (CIPLA)

  • ग्रासिम (GRASIM)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

  • एचडीएफसी (HDFC)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • रिलायन्स (RELIANCE)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com