Pharma share: 'या' कंपनीने गुंतवणुकदारांना बनवले कोट्यधीश

गेल्या 26 वर्षांत गुंतवणूकदारांच्या एक लाखाचे त्यांनी तब्बल एक कोटी रुपये केले आहे.
cipla
ciplasakal

सिप्ला (Cipla)  कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. गेल्या 26 वर्षांत गुंतवणूकदारांच्या एक लाखाचे त्यांनी तब्बल एक कोटी रुपये केले आहे. सध्या सिप्लाच्या शेअरची किंमत 1,108 रुपये आहे. तर त्याची मार्केट कॅप 89,415.78 कोटी रुपये आहे. सिप्ला शॉर्ट टर्मसाठीही उत्तम गुंतवणूक असल्याचे सिद्ध झाले आहे.

या वर्षी सेन्सेक्स एक टक्क्यांपेक्षा जास्त कमकुवत झाला, पण सिप्लाचे शेअर्स 19 टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत म्हणजेच सिप्लाने सेन्सेक्सला मागे टाकले आहे. (share market - pharma company cipla shares)

cipla
Share Market: शेअर बाजारात गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स 550 तर निफ्टी 185 अंकांनी वधारला

22 मार्च 1996 रोजी सिप्लाचे शेअर्स अवघ्या 10.33 रुपयांना होते, जे 17 ऑक्टोबर 2022 पर्यंत जवळपास 107 पटीने वाढून 1108 रुपये झाले. याचा अर्थ त्या वेळी सिप्लामध्ये गुंतवलेले 1 लाख आज 1.07 कोटी रुपये झाले असेल. सिप्लाचे शेअर्स 17 डिसेंबर 2021 रोजी 850 रुपयांवर होते, जे एका वर्षातील विक्रमी नीचांक आहे. यानंतर, सिप्लाच्या किंमती मजबूत झाल्या आणि 35 टक्क्यांहून अधिक वाढीसह 6 ऑक्टोबर 2022 रोजी त्याची किंमत 1149 रुपयांवर पोहोचली, जो गेल्या 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक आहे.

cipla
Stock: 'या' सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना बनविले कोट्यधीश, 1 लाखाचे केले 2.77 कोटी

कंपनी काय करते ?
सिप्ला श्वसन, हृदय, शुगरसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी औषधे बनवते, जी जगभर विकली जातात. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तिचा निव्वळ नफा तिमाही आधारावर कमी झाला आहे, पण महसूल वाढला आहे.

सिप्लाचा निव्वळ नफा एप्रिल-जून 2022 मध्ये 652.96 कोटी रुपयांवरून 759.16 कोटी रुपयांवर घसरला, तर त्याच काळात त्याचा महसूल 2,946.6 कोटी रुपयांवरून 3,157.13 कोटी रुपयांवर पोहोचला.

cipla
Stock : बँकिंग स्टॉक येत्या काळात देईल 56% नफा, आता गुंतवणूकीची चांगली संधी...

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com