sebi
sebisakal

गुंतवणुकदारांना प्रशिक्षित करा ! सेबी सदस्यांचे सीडीएसएल ला आवाहन

गुंवतणुकदारांच्या जागृतीवर भर द्यावा, असे सेबीचे सदस्य अनंत बारुआ यांनी येथे सांगितले

मुंबई: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लि. ने सहा कोटी कार्यरत डिमॅट खाती उघडणे ही कौतुकास्पद कामगिरी असली तरी आता त्यांनी गुंवतणुकदारांच्या जागृतीवर भर द्यावा, असे सेबीचे पूर्णवेळ सदस्य अनंत बारुआ यांनी येथे सांगितले.

sebi
Pune-Mumbai Express: आरक्षित गाड्यांसाठी सीझन पास नाहीच

सीडीएसएल ने नुकताच हा विक्रम नोंदविला आहे. अशी कामगिरी करणारी सीडीएसएल ही भारतीय शेअरबाजारातील पहिलीच नोंदणीकृत डिपॉझिटरी सर्व्हिस आहे. यानिमित्त झालेल्या एका विशेष समारंभास सेबी चे पूर्णवेळ सदस्य अनंत बारुआ व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेअरबाजारात गुंतवणुक करणारे गुंतवणुकदार विविध शेअर ब्रोकरकडे किंवा बँका, वित्तसंस्था यांच्याकडे शेअर ठेवण्यासाठी डिमॅट खाती उघडतात. त्या खात्यांचे संचालन सीडीएसएल सारख्या डिपॉझिटरी संस्थांतर्फे केले जाते.

sebi
Mumbai : महापौर पेडणेकर दिशा सालियानच्या घरी

डिमॅट खातेदारांची संख्या वाढत असताना त्यांच्यात यासंदर्भातील सर्वच मुद्यांवर जागृती होणे गरजेचे आहे, असे बारुआ यावेळी म्हणाले. प्रत्यक्ष कागदी शेअरच्या व्यवहारात होणाऱ्या अडचणींमुळे डिमॅट खात्यात शेअर ठेवण्याची संकल्पना जन्माला आली. आता सहा कोटी डिमॅट खाती उघडल्याने, ही पद्धती किती सुलभ व पारदर्शक आहे, हेच दिसून येते, असेही त्यांनी दाखवून दिले. गेली दोन वर्षे कोरोना काळातही शेअरचे व्यवहार सुरळित ठेवण्यासाठी सर्वांनीच अथक प्रयत्न केले. या अशा प्रयत्नांमधूनच शेअरबाजार उच्चांकी स्तरावर पोहोचला व त्याचा फायदा सर्वांनाच झाला. नव्या गुंतवणुकदारांना सजगतेने शेअरबाजारात निर्णय घेता यावेत यासाठी अशा संस्थांनी जनजागृतीही करावी, यावरही त्यांनी भर दिला.

हा अभिमानाचा क्षण असल्याचे सीडीएसएल चे अध्यक्ष बी. व्ही. चौबळ म्हणाले. आता केवळ महानगरांमधूनच नव्हे तर दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमधूनही मोठ्या संख्येने डिमॅट खाती उघडली जात आहेत. भारतीय शेअरबाजारांचा विस्तार होत असल्याचेच हे चिन्ह आहे. सहा कोटी डिमॅट खाती असली तरी देशाची लोकसंख्या पाहता टक्केवारीच्या हिशोबात ही संख्या फारच कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रात विस्ताराला मोठी संधी असल्याचेही ते म्हणाले. यावेळी सीडीएसएल च्या सीईओ नेहल व्होरा यांनीही खातेदारांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com