Accounting: अकाउंटिंग नेमकं काय असते? समजून घ्या संकल्पना

बिजनेसशी संबंधित अशा सर्व वस्तू, व्यक्ती व खर्चाची, तसेच उत्पन्नाची नोंद ठेवली जाते.
accounting
accountingSakal

अकाउंटिंग म्हणजे काय?

अकाउंटिंग करताना बिझनेसचा पूर्ण नफा/तोटा कळावा, यासाठी बिजनेसशी संबंधित अशा सर्व वस्तू, व्यक्ती व खर्चाची, तसेच उत्पन्नाची नोंद ठेवली जाते, यालाच ‘अकाउंट्स’ ठेवणे असे म्हणतात.

अकाउंटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या संकल्पना-

Business Transaction (व्यापार अथवा व्यवसायाचा व्यवहार) : अनेक व्यवहारांचा मिळून बिजनेस बनतो. उदा. माल विकत घेतला, माल विकला, पैसे आले, पैसे दिले या सर्व घटनांना आपण व्यवहार असे म्हणतो.

Cash Transaction (रोकड व्यवहार) : एखादे बिझनेस ट्रान्झॅक्शन जसे मालमत्ता किंवा माल विकत घेताना किंवा विकताना जर पैसे घेऊन/देऊन व्यवहार झाला असेल, तर त्या व्यवहाराला रोकड व्यवहार असे म्हणतात. (What is accounting? Understand the concept)

accounting
आर्थिक नियोजनसाठी सकाळ मनी मासिक उपयुक्त ठरेल

Credit Transaction (पत व्यवहार) : एखादे बिझनेस ट्रान्झॅक्शन जसे मालमत्ता किंवा माल विकत घेताना किंवा विकताना जर उधारीवर घेतले/दिले असतील, तर त्या व्यवहाराला क्रेडिट (पत) व्यवहार असे म्हणतात.

Goods (माल) : व्यापारामध्ये नियमितपणे व प्रामुख्याने खरेदी केली जाणारी आणि विकली जाणारी वस्तू म्हणजे गुड्स (माल) होय. व्यवसायाचाच मुख्य हेतू हा नफा कमावणे हा असतो आणि तो मालाच्या खरेदी-विक्रीवर अवलंबून असतो.

Assets (मालमत्ता) : ॲसेट्स म्हणजे बिझनेससाठी आवश्यक असणाऱ्या किंवा व्यवसायाला सहायक ठरणाऱ्या अशा मौल्यवान व पैशामध्ये बदलता येण्याजोगा वस्तू.

Liabilities (देणी) : लायबलिटीज म्हणजे आपल्या बिझनेसने इतरांना द्यावयाच्या देणी. जसे बँकेकडून घेतलेले कर्ज, उधारीवर खरेदी केलेला माल, व्याज देय हे नेहमी ताळेबंदाच्या डाव्या बाजूला दाखवतात.

accounting
नव्या आर्थिक वर्षात शेअर बाजार सुसाट! सेन्सेक्स 708 अंकांनी वधारला

Capital (भांडवल) : भांडवल म्हणजे बिझनेसच्या मालकाने बिझनेस सुरू करण्यासाठी केलेली गुंतवणूक. बिजनेसचा मालक बिझनेसचे भांडवल म्हणून पैसा, माल किंवा मालमत्ता अशी कोणतीही गोष्ट गुंतवू शकतो.

Debtors (देणेकरी) : आपल्या बिझनेसला ज्या व्यक्ति किंवा संस्था काही रक्कम देणे असतात, अशा व्यक्तींना देणेकरी असे म्हणतात. (मराठीत याला ‘ऋणको’ असा शब्दही वापरला जातो.) देणेकरी हे नेहमी मालमत्ता म्हणून वागवले जातात.

Creditors (घेणेकरी) : आपला बिझनेस ज्या व्यक्ती किंवा संस्थांना काही रक्कम देणे असतो, अशा व्यक्ती किंवा संस्थांना घेणेकरी असे म्हणतात. (मराठीत याला ‘धनको’ असा शब्द वापरला जातो.) घेणेकरी हे नेहमी देणी म्हणून वागवले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com