गोफण | एकीकडे आम्हांस गुरुवर्य म्हणता अन् दुसरीकडे...

Gofan Satire Article : अखेर आपण मान्य केलं की, तुमच्याचमुळे आम्हांस गतवेळी पराभवाचे तोंड बघावे लागले. आपण एकीकडे वंदनीय, गुरुवर्य म्हणता.. पाय धरता अन् दुसरीकडे असे...
sakal gofan article
sakal gofan articleesakal

प्रति,

गुरुवर्य चंद्राबाबू मराठवाडकर

जुना खिलाडी मार्ग, संभाजी नगर

माननीय,

आम्ही तुमचा आदर करतो. गरज पडेल तेव्हा आपले पाय धरतो.. तुम्ही टाकून-पाडून बोललेलं कधीच मनावर घेत नाही. पण या खेपेला तुम्ही आम्हांस दिल्लीची संधी द्यावी, ही आमची इच्छा आहे. पक्षश्रेष्ठींचीही तीच मनीषा असल्याने तुम्ही आमच्या उमेदवारीस अडथळा आणू नये, असे आम्हांस मनोमन वाटते.

मागे तुम्ही रागाच्या भरात म्हणाला होता की, आस्मादिकांच्या (माझ्या) दहा वर्षांच्या इच्छेमुळे तुम्हास पराभवाचं तोंड बघावं लागलं. पण मागे जे झालं ते आता तुम्ही विसरुन जायला हवं. भलेही आपण गुरुस्थानी असाल, मात्र असं चारचौघात तोंड सोडून बोलणं आपणास शोभत नाही. पक्षहिताचा विचार करुन, आम्हांस पाठबळ द्याल, ही अपेक्षा आहे.

आपण म्हणता मागच्या वेळी धोका झाला.. ते जर खरंच खरं असेल तर यावेळीही आपणास धक्का बसणार नाही कशावरुन? नाहीतरी या खेपेला आमच्या हातात इरोधी नेत्याची सत्ता आहे. त्यामुळं आपण नव्या दमाच्या तरुणांचा विचार करुन आमच्या दहा वर्षांच्या इच्छेला बळ द्यावं, ही विनंती.

श्रेष्ठींनी आपल्या दोघात हा विषय मिटवण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही पुन्हा-पुन्हा तुमचे पाय धरतो, तुमचा मानमरातब ठेवतो, तुमचा शब्द उचलून धरतो.. पण नाराज होऊ नका. आम्हांस पाठबळ द्या. नाहीतर भविष्यात काय होईल, हे आज सांगणं कठीण आहे.

ध्यानात असू द्या, ही नम्र विनंती!

आपला विश्वासू

अंबाजी दिलदार

इरोधी पार्टी नेता, संभाजी नगर

प्रति,

अंबाजीराव दिलदार (दावेदार)

इरोधी पार्टी नेते

प्रिय, शिष्यवर्य,

आपले पत्र मिळाले. आपण दिलखुलासपणे लिहिले ते बरे झाले. अखेर आपण मान्य केलं की, तुमच्याचमुळे आम्हांस गतवेळी पराभवाचे तोंड बघावे लागले. आपण एकीकडे वंदनीय, गुरुवर्य म्हणता.. पाय धरता अन् दुसरीकडे असे पाय खेचता.. ते बरे नव्हे.

आपणास पक्षाने इरोधी गटाचा नेता केलं, पक्षाचा चेहरा म्हणून पुढे येण्यास संधी दिली.. हीच मोठी गोष्ट आहे. आम्हीही कधी त्याबद्दल रडारड केली नाही. पण एवढं सगळं देऊनसुद्धा आपण दिल्लीचं तिकिट मागता? हे बरं नाही. पक्षातल्या ज्येष्ठाचा, अनुभव्यांचा तुम्ही विचार कराल, अशी अपेक्षा आहे.

दिल्लीची निवडणूक लढवणं म्हणजे पायाचा मुरगळा काढण्याएवढं सोपं नाही. तुम्ही भलेही श्रेष्ठींकडे एकाचे दोन सांगत असाल पण खरी परिस्थिती निराळी आहे. लोकांच्या हृदयाच आम्ही विराजमान आहोत, हे वरिष्ठांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे आपण आमच्यात लुडबूड करु नये, हीच आमची इच्छा आहे.

काहीच दिवसांपूर्वी आपण दोघेही व्हॅनिटी व्हॅनमधून एकमेकांना शब्द दिला होता. पक्षश्रेष्ठी ठरवतील तोच उमेदवार असेल आणि आपण माझं काम कराल, हे ठरलं होतं. मगे हे आता अचानक पक्ष सोडण्याच्या वावड्या का सोडताय? तिकडे जावून तुम्हाला चार दिवस बरं वाटेल, पण नंतर पश्चाताप होईल.. लक्षात घ्या मी आजवर इकडे आहे, याचं कारण आमचा अनुभव! कळलं का?

आम्हाला साथ द्या, त्यातच पक्षाचं आणि आपलं भलं आहे.. धन्यवाद!

आपणास आशीर्वाद

चंद्राबाबू मराठवाडकर

जुना खिलाडी पथ,संभाजी नगर

समाप्त

Santosh Kanade

(santosh.kanade@esakal.com)

sakal gofan article
गोफण | अण्णा गळकेंनी खरंच धमकी दिली का?
sakal gofan article
गोफण | बारामतीकर काकांचं निमंत्रण अन् पाहुणे भुकेने व्याकूळ
sakal gofan article
गोफण | पत्रकारांवर बहिष्कार घालणाऱ्यांनी परिषदेत येऊ नये!
sakal gofan article
गोफण | 'प' से पनौती नहीं... पर्णकुटी!
sakal gofan article
गोफण| सत्तेतही तुम्हीच अन् कुलूप ठोकणारेही तुम्हीच...
sakal gofan article
गोफण | मी पुन्हा येईन... मग यांनी काय करायचं?
sakal gofan article
गोफण | पुण्य नगरीची जहागिरी पाटीलबुवांना सुटेना...
sakal gofan article
गोफण | देवाभाऊंकडेच जाणार सत्तेची सूत्र
sakal gofan article
गोफण | टोलधाडीला फोडून काढण्यासाठी राजासाब सज्ज
sakal gofan article
गोफण | गावात कुणी विरोधक आहे का याचा शोध घ्या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com