Corona Virus : भारताचा विकासदर 5.1 टक्के राहणार : फिच रेटिंग्स

India's growth rate to remain at 5.1 percent as per Fitch Ratings due to coronavirus
India's growth rate to remain at 5.1 percent as per Fitch Ratings due to coronavirus

पुणे : फिच रेटिंग्सने भारताच्या 2020-21 या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजित विकासदरात कपात करून तो 5.6 टक्क्यांवरून 5.1 टक्क्यांवर आणला आहे. कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे व्यावसायिक गुंतवणूक आणि निर्यातीवर होणाऱ्या विपरित परिणामांमुळे देशाचा विकासदर घसरणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वॉलमार्ट करणार दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती

डिसेंबर 2019 मध्ये फिचने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकासदर 5.6 टक्के आणि त्यापुढील वर्षासाठी 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. ग्लोबल इकॉनॉमिक आउटलूक 2020 या आपल्या अहवालात फिचने कोरोना व्हायरस बाधीत रुग्णांची संख्या वाढतच असून त्याचा विपरित परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे म्हटले आहे. विविध मालाच्या पुरवठा साखळीत मोठा अडथळा निर्माण झाल्यामुळे गुंतवणूक आणि निर्यातीवर परिणाम होईल असे यात म्हटले आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसचा फैलावाला अटकाव करण्यासाठी सरकारने शाळा, महाविद्यालये, दुकाने, मॉल कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध वस्तूंच्या पुरवठ्यासाठी चीनवरील भारताचे अवलंबित्व मोठे आहे.

चीनमधील औद्योगिक उत्पादनच ठप्प झाल्यामुळे भारतातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसणार आहे. त्यातच येस बॅंकेसारख्या प्रकरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणखीच तीव्र झाली आहेत, असे मत फिचने व्यक्त केले आहे.

जागतिक मंदी येणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com