Girl Burnt Alive: धक्कादायक ! पोलीस बूथ जवळ महिलेला जिवंत जाळल्याची घटना

हे हत्याप्रकरण असून तरूणीला दुसऱ्या ठिकाणी जाळून तिला पोलीस बूथ जवळ टाकण्यात आले असे पोलीसांचे म्हणणे आहे.
25 year old girl burnt Alive near police booth
25 year old girl burnt Alive near police boothesakal

गाझियाबादच्या औद्योगिक क्षेत्रात बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास तरूणीला जाळून पोलीस चौकी परिसरात टाकल्याची धक्कादायक घटना घडली.२५ वर्षाच्या तरूणीला पोलीस चौकीपासून ५० मीटर अंतर दूर जाळून टाकण्यात आले.तरूणीचे प्रेत रूग्णालयात हलवण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.(crime) महिलेचा चेहरा पूर्णपणे जळाल्याने तिची ओळख अद्याप होऊ शकली नाही.हे हत्याप्रकरण असून तरूणीला दुसऱ्या ठिकाणी जाळून तिला पोलीस बूथ जवळ टाकण्यात आले असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पार्क जवळून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी या तरूणीला बघताच पोलीसांना (Police Station)सूचना दिली होती.यावेळी आगीच्या भडक्यात तरूणीचे कपडे पूर्णपणे जळलेले होते.तसेच तिचा चेहरा देखील जळाल्याने ओळखही अद्याप पटू शकली नाही.तरूणीला मारून तिची ओळख पटू नये असा आरोपींचा प्रयत्न असावा असा अंदाज लावला जात आहे.

25 year old girl burnt Alive near police booth
Nashik Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयिताला पोलिस कोठडी

पोलीसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू झालाय.ज्या ठिकाणी तरूणीचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला त्या ठिकाणी लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू आहे.पोलीस चौकीजवळ ज्या ठिकाणी तरूणीचे प्रेत सापडले तिथे महिलेला जाळण्याचा कुठलाच पुरावा पोलीसांच्या हाती अजूनही लागलेला नाही.त्यामुळे महिलेचा मृतदेह घटनास्थळावरून गाडीने पोलीस चौकी परिसरात आणून टाकल्याच्या अंदाजावर पोलीसांचा पुढील तपास सुरू आहे.

25 year old girl burnt Alive near police booth
Crime : देवीचा मळा भागात जमावाने जाळल्या 2 दुचाकी

याआधीही लोणी परिसरात घडली अशी घटना

दोन महिन्याआधी अशीच एक घटना लोणी परिसरात घडली होती.दिल्लीमधे जाळल्यानंतर या महिलेला लोणी परिसरात आणून टाकण्यात आले होते.त्या महिलेचाही चेहरा पूर्णपणे जळल्याने बरेच दिवस तिची ओळख पटू शकली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com