Dev Diwali 2022 : या कारणामुळे कार्तिकी पौर्णिमेला साजरी होते देव दिवाळी, जाणून घ्या पौराणिक महत्त्व

Dev Diwali 2022
Dev Diwali 2022esakal

Dev Diwali 2022 : कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस मोठ्या मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो याला देव दिवाळी असेही म्हणतात. यामागे एक पौराणिक कथा आहे. तसेच या दिवशी नदीत स्नान आणि दीपदानाचे विशेष महत्त्व आहे. चला तर जाणून घेऊया देव दिवाळीची पौराणिक कथा ज्योतिष अभ्यासक विजय जोशी गुरुजी यांच्याकडून.

Dev Diwali 2022
Shani Astro Theory : तुमच्या कुंडलीतील शनी ठरवतो आयुष्याची दिशा, जाणून घ्या महत्वपूर्ण सिद्धांत

जल्लोषात साजरी होते 'देव दिवाळी'

ज्योतिष अभ्यासक विजय जोशी सांगतात, देव दिवाळी हा सण दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो. देव दिवाळीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर तथा नाशिक येथील गोदा तिरावर विशेष उत्सव आयोजित केले जातात. या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे शिवशंकराचा रथोत्सव साजरा केला जातो. या सह मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई तथा फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. नाशिक येथे गोदा काठावर विशेषतः रामतीर्थ येथे अनेक दिवे लावले जातात.

Dev Diwali 2022
Kaala Dhaga : सावधान! 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा; फायद्याऐवजी होईल नुकसान

देव दिवाळीला देवता पृथ्वीवर येतात

देव दिवाळी साजरी करण्याबाबत अशी श्रद्धा आहे की या दिवशी देव-देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दिवाळीचा सण साजरा करतात. यावर्षी पौर्णिमा तिथीला 07 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारंभ होत असून 8 नोव्हेंबर रोजी पौर्णिमा तिथी समाप्ती होणार आहे. परंतु या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे यावेळी देव दिवाळी 07 नोव्हेंबर 2022 रोजी साजरी केली जाणार आहे.

Dev Diwali 2022
Rudraksh Niyam: देवाचा प्रकोप का होतो? तुम्हीही अशा प्रकारे रुद्राक्ष घालत असल्यास ते टाळावे

कथा देव दिवाळीची

पौराणिक कथेनुसार, त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवरील मानवांना आणि स्वर्गातील सर्व देवतांना आपल्या दहशतीने मारले होते. त्रिपुरासुरामुळे सर्व देवता त्रासले होते. सर्वांनी मदतीसाठी भगवान शंकराकडे धाव घेतली आणि त्रिपुरासुराच्या अंतासाठी प्रार्थना केली. भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला. त्रिपुरासुरच्या अंतानंतर त्याच्या दहशतीतून मुक्ती मिळाल्यावर सर्व देवता प्रसन्न झाले आणि त्यांनी स्वर्गात दिवा लावला. यानंतर सर्व देवतांनी शिव शंकराची नगरी काशीला येत दिवा लावून आनंद साजरा केला. यानंतर कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसाला देव दिवाळी साजरी केली जाऊ लागली. या दिवशी त्रिपुरासुर राक्षसाचा वध झाला, म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात.

Dev Diwali 2022
Astro Tips: 'हे' संकेत तुम्हालाही दिसतायेत? तर मग नक्कीच तुमचा शुभ काळ सुरू होणार

कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व

हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी स्नान, दान, व्रत आणि दीपदान यांचे विशेष महत्त्व आहे. यासोबतच सुख-समृद्धीसाठी कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मीपूजन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला होता.

Dev Diwali 2022
व्रतबंधाचा संस्कार सर्वांसाठी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com