Ganesh Festival 2023 : गणेश शब्दाचा अर्थ काय?

गणेश हा शब्द 'गण' आणि 'ईश' या दोन शब्दांच्या संधीपासून बनलेला आहे.
Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthisakal

Ganesh Festival 2023 : गणपती, गणेश या शब्दांच्या विस्तृत व्याख्या संस्कृत साहित्यात दिलेल्या आहेत. मुळात, गणेश हे एक तत्त्व आहे. गणेश हा शब्द 'गण' आणि 'ईश' या दोन शब्दांच्या संधीपासून बनलेला आहे. 'गण' शब्दातील गकार हा ज्ञानार्थवाचक आणि 'ण'कार हा मोक्षवाचक सांगितलेला आहे. 'ईश' हा शब्द स्वामित्वदर्शक आहे. ब्रह्मवैवर्तपुराणात,

"ज्ञानार्थवाचको गश्च णश्च निर्वाणवाचकः । तयोरीशं परब्रह्म गणेशं प्रणमाम्यहं ॥ " अर्थात, ज्ञान आणि मोक्ष यांचा स्वामी तसेच परमतत्त्व या अर्थाने गणेश शब्द व्यक्त होतो.

त्याचप्रमाणे 'गण' शब्दाचा अर्थ वर्ग, समुदाय असा असून, 'ईश' म्हणजे स्वामी अर्थात एखाद्या समुदायाचा स्वामी होय. हा समुदाय नक्की कोणता? तर गणांचा समुदाय, अर्थात आठ वसु, अकरा रुद्र आणि बारा आदित्य यांच्या गण समुदायाचा स्वामी होय. (Ganesh Chaturthi Festival)

Ganesh Chaturthi
Ganesh Festival: यवतमाळमध्ये गणेशाच्या आकर्षक मूर्ती; दर्शन घेतलं का?

छंदशास्त्रात देखील आठ प्रकारचे गण सांगितलेले आहेत ते असे - भगण, मगण, नगण, यगण, जगण, रगण, सगण, तगण. या गणांचा अधिपती तो गणपती होय. तसेच, अक्षरांच्या समूहास देखील गण असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या देवगण, मनुष्यगण व राक्षसगण या तीन गणांचा अधिपती तो 'गणपती' होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com