Guru Purnima 2023: वर्षातला सर्वात मोठा चंद्र आज दिसणार; जाणून घ्या सूपरमून म्हणजे काय?

यंदाची गुरुपौर्णिमा एका विशिष्ट खगोलीय स्थितीमुळे खास आहे. खगोलप्रेमींसाठी आजची गुरुपौर्णिमा विशेष असणार आहे.
SUpermoon
SUpermoonSakal

गुरुपौर्णिमा हा गुरुंचं स्मरण करण्याचा, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक जण आपल्या गुरुंना वंदन करतात, त्यांच्यासाठी भेटवस्तू आणतात. हल्ली गुरुंसाठी खास मेसेज तयार करूनही पाठवले जातात. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धाही भरवल्या जातात.

गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. त्याबद्दलचा ऐतिहासिक संदर्भ आपण लहानपणापासूनच शिकत आलो आहेत. पण यंदाची गुरुपौर्णिमा एका विशिष्ट खगोलीय स्थितीमुळे खास आहे. खगोलप्रेमींसाठी आजची गुरुपौर्णिमा विशेष असणार आहे. आजच्या दिवशी आकाशात सुपरमून पाहता येणार आहे. इतर दिवसांपेक्षा चंद्र अधिक तेजस्वी आणि मोठा दिसतो. (Latest Marathi News)

SUpermoon
Guru Purnima 2023 : कायम लक्षात राहतील अशा गुरू-शिष्यांच्या जोड्या

वर्षातला सर्वात मोठा चंद्र आज दिसणार आहे. यानंतर पुढच्या वर्षभरात तीन दिवस सूपरमून दिसणार आहेत. आजचा दिवस, २९ सप्टेंबर, १ ऑगस्ट, ३० ऑगस्ट चार दिवशी सुपरमून दिसणार आहे.

सूपरमून म्हणजे काय?

जेव्हा चंद्र आपल्या कक्षेमध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि पूर्ण आकारात असतो, तेव्हा ही स्थिती दिसून येते. चंद्र जेव्हा पृथ्वीची परिक्रमा करत असतो, तेव्हा एक वेळ अशी येते, जेव्हा दोघांच्यातलं अंतर कमी होतं. याला उपभू असंही म्हणतात. आणि ज्यावेळी या दोघांमधलं अंतर सर्वात जास्त असतं, तेव्हा त्या स्थितीला अपभू असं म्हणतात.

SUpermoon
Guru Purnima 2023 : तुम्हीही गुरुंना भेटवस्तू देण्याचा विचार करताय? मग 'ही' ५ गिफ्ट्स नक्कीच द्या

पूर्ण चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो, त्यामुळे तो अधिक चमकदार आणि तेजस्वी दिसतो. तसंच याचा आकारही सामान्य चंद्रापेक्षा अधिक मोठा दिसतो. या स्थितीमध्ये पृथ्वी आणि चंद्राचं सरासरी अंतर ३,८४,४०० किलोमीटर असते. पण जेव्हा सूपरमून दिसणार असतो, त्या दिवशी हे अंतर ३,७०,००० किलोमीटर असते. त्यामुळे आपल्याला सूपरमून अधिक तेजस्वी आणि मोठा दिसतो.

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा वातावरणात काही बदल आढळून येतात. यामध्ये समुद्राला भरती येणे, वादळ येणे, अशा घटनाही घ़डू शकतात.

SUpermoon
Guru Purnima 2023 : गुरुची विद्या गुरूच्या फळाला? राजकीय गुरूलाच गंडा घालणारे शिष्य!

सूपरमून कसा पाहायचा?

सूपरमून तुम्ही उघड्या डोळ्यांनीही पाहू शकता. त्यासाठी चष्मा वगैरे घालण्याची गरज नाही. पण तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे चंद्रामधला बदल अनुभवायचा असेल, तर तुम्ही दुर्बिणीनेही पाहू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com