Jyeshtha Gauri Puja : गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात, माहितीये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jyeshtha Gauri Puja

Jyeshtha Gauri Puja : गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात, माहितीये?

Jyeshtha Gauri Puja : गणपती पाठोपाठ येणाऱ्या गौराईच्या आगमनाने घरात चैतन्य द्विगुणीत होते. लाडक्या गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. महाराष्ट्रात सगळीकडेच गौराईचा सण पारंपरिक पध्दतीने साजरा होतो. गौराईला भाजी-भाकरीचा नैवेद्य, गोडाचा नैवेद्य, फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. पण कोकण आणि अन्य काही भागांमध्ये गौराईचे आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी गौराई पूजनाला तिखटाचा म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो.

हेही वाचा: Jeshtha Gauri Pujan 2022 : ज्‍येष्ठागौरीच्या हारांना महागाईचा सुगंध

गौरीच्या आगमनानंतर कोकणामधील अनेक घरामध्ये सर्व महिला एकत्र येत झिम्मा-फुगडी, बस-फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात. घरी आलेल्या माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते. गौराईच्या पाहुणचारात कोणतीही गोष्ट कमी पडून दिली जात नाही. महत्वाचे म्हणजे सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौराईला तृप्त करण्यासाठी तिच्या आवडीची प्रत्येक गोष्ट केली जाते.

हेही वाचा: Jyeshtha Gauri Puja : गौरीपूजनाचं तुमच्या राशीला काय मिळणार फळ? जाणून घ्या

'या' तिखटाच्या नैवेद्यात नेमकं काय असतं

गौराईसाठी मटण, चिकन, खेकडे, मासे यांचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी तर गौरीसाठी वाईन देखील ठेवली जाते. गौराईच्या पाहुणचारामध्ये कोणतीही कसर सोडली जात नाही.

हेही वाचा: Gauri avahan 2022 : ज्येष्ठा गौरीच्या आगमनाच्या दिवशी हे उपाय करा, नशीब फळफळेल

तिखटाचा नैवेद्य दाखवण्याची कथा

असे सांगितले जाते की, पौराणीक कथेत गौराईचे शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतिला आपले भूतगण दिले. हे भूतगण तिच्या रक्षणासाठी दिलेले असतात. गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्या माणसांना खूप आनंद झाला. त्यांनी तिची पूजा केली. तिला गोडधोड खायला बनवलं. तिचा चांगला पाहुणचार केला.

हेही वाचा: Gauri Ganpati 2022: गौरीपूजन व्रताची काय आहे आख्यायिका?

गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्व जण विसरले. पण गौराई त्यांना विसरली नाही. शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना समशानात रहायची सवय आणि मांस आवडत असे. त्यांची अडचण गौरी समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था तिने करायला लावली. त्यावेळी मांसाहार वर्ज असताना सुद्धा तळागाळातील आपल्या माणसांसाठी तिची कळकळ होती. तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केले

हेही वाचा: Jyeshtha Gauri Puja : गौरीपूजनाचं तुमच्या राशीला काय मिळणार फळ? जाणून घ्या

या प्रसंगाची आठवण ठेऊन जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्या बरोबर भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांच्यासाठी मटण केले जाते. कारण ते खुश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे. त्या दिवशी मटण करतात पण त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जात नाही. तर तिच्या सोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो.

Web Title: Jyeshtha Gauri Puja Ganeshotsav 2022 Nonveg For Gauri Naivedya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..