Krishna Janmashtami : श्री कृष्णाच्या 'या' मंदिरांच्या केवळ दर्शनाने भाग्य उजळते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Krishna Janmashtami

Krishna Janmashtami : श्री कृष्णाच्या 'या' मंदिरांच्या केवळ दर्शनाने भाग्य उजळते

श्री कृष्णाचा जन्म मथुरेला झाला. मथुरेसह देशात असे अनेक मंदिर आहेत जे श्री कृष्णाचे पावन तिर्थ म्हणून प्रसिध्द आहेत. तिथे केवळ दर्शन आणि पूजनाने सर्व दूःख दूर होतात. यंदाच्या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कृष्णाच्या या चमत्कारीक व भव्य मंदिरांविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा: Gokulashtami : १८ की १९ कोणत्या दिवशी करायची गोकुळाष्टमी?

श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर उत्तर प्रदेश

असे मानले जाते की, श्री कृष्णाचा जन्म द्वापार युगात उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातल्या एका जेलमध्ये झाला. जिथे कृष्णाचा जन्म झाला होता तिथेच आता श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर आहे. तिथे रोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात.

हेही वाचा: Krishna Janmashtami : अशी करा "गोकुळाष्टमी' साजरी 

इस्कॉन मंदिर, दिल्ली

दिल्लीतले श्री श्री राधा पार्थसारथी मंदिर ज्याला इस्कॉन मंदिर म्हणून ओळखले जाते. इथे कायम हरे राम हरे कृष्णाचा जप सुरू राहतो. हे उत्तम वास्तुकलेचे उदाहरण असून इथे राधा कृष्णाबरोबर राम, सीता आणि लक्ष्मणचे पण दर्शन मिळते. मंदिरात विविध कलाकृती बघायला मिळतात.

हेही वाचा: Krishna Janmashtami : नातं गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याचं!

बाके बिहारी मंदिर, उत्तर प्रदेश

कृष्णाच्या प्रसिध्द मंदिरांपैकी एक वृंदावनातील बाके बिहारी मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १८६४ मध्ये स्वामी हरिदास यांनी केली होती. इथे सावळ्या मूर्तीतील कृष्णाचे दर्शन मिळते.

हेही वाचा: Friendship Day: आजही का भगवान श्री कृष्ण आणि सुदामाची मैत्री अजरामर आहे?

भालका तिर्थ, गुजरात

हे स्थान गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये आहे. असे मानले जाते की, भालका तिर्थ या ठिकाणी भगवान श्री कृष्णाला आराम करताना शिकारीचा बाण लागला होता. त्यानंतर ते पृथ्वी लोक सोडून वैकुंठात गेले. बाणाला भल्लापण म्हटले जात असल्याने या ठिकाणाला भालका तिर्थ म्हणतात.

हेही वाचा: Krishna Janmashtami 2022: कृष्ण जन्माष्टमीला का फोडली जाते दही-हंडी?

द्वारकाधीश मंदिर, गुजराथ

द्वारकाधीश श्री कृष्ण यांचे हे पवित्रस्थान भक्तांसाठी महत्वपूर्ण आहे. इथे श्री कृष्णाला द्वारकाधीशाच्या रूपात पूजले जाते.

हेही वाचा: कृष्ण जन्मभूमी खटला : शाही इदगाह मशीद हटवण्याची याचिका मंजूर

Web Title: Krishna Janmashtami Visit These Shri Krishna Temples In India To Brightens Ones Fortune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..