Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याच्या अशा भन्नाट रांगोळ्या... सगळे करतील फक्त तुमचेच कौतुक

या रांगोळ्यांना खूप महत्व असतं, बघूयात अशाच काही भन्नाट रांगोळ्या...
Gudi Padwa Rangoli Designs
Gudi Padwa Rangoli Designsesakal

Gudi Padwa Rangoli Designs : गुढी पाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात; दरवर्षी हा सण हिंदू लोकांमध्ये खूप उत्साहाने साजरा होतो. प्रभू रामचंद्रांपासून सुरु झालेल्या या परंपरेला आपण दरवर्षी दारापुढे गुढी उभारतो अन् त्या भोवती रांगोळी काढतो, या रांगोळ्यांना खूप महत्व असतं, बघूयात अशाच काही भन्नाट रांगोळ्या.

काही बेसिक घरातल्या गोष्टींनी मिनिटांमध्ये काढता येईल अशी ही सुंदर रांगोळी आहे. शिवाय यात तुम्ही सुंदर शेडिंग देखील करु शकतात.

Gudi Padwa Rangoli Designs
Gudi Padwa 2023 : साखर गाठी माळेचं नंतर करायचं काय?

अनेकदा असं होतं की गुढी काढायला जातो पण काठीच वाकडी दिसते किंवा वरचा गडू लहान मोठा होतो, यासाठी ही ट्रिक उत्तम आहे. शिवाय अंदाजाने काम करण्याची गरज नसल्याने अगदी परफेक्ट आहे.

Gudi Padwa Rangoli Designs
Gudi Padwa 2023 : आज गुढी पाडवा, आजच्या दिवशी कोणाला चुकूनही देऊ नका घरातील या 4 वस्तू

साडीचा काठ परफेक्ट दिसायला हवा आहे? मग जराशी चमच्याची मदत घ्या.. ही रांगोळी तुमच्या साडीचा काठ अगदीच परफेक्ट बनवेल. एक गंमत सांगू.. तुम्ही गुढीच्या साडीचाच रंग या रांगोळीत काढू शकतात.

Gudi Padwa Rangoli Designs
Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याला उभारलेल्या गुढीला कडूनिंबाचा पाला का वाहतात? वाचा कारण

असं काही गरजेच नाही ना की गुढी पाडवा आहे म्हणजे तुम्ही गुढीचीच रांगोळी काढली पाहिजे. ही डिझाईन सुद्धा खूप भारी आहे आणि त्यात खूप कलर्स वापरुन रांगोळी काढणं तुम्हाला आवडत असेल तर तुमच्यासाठी अगदीच परफेक्ट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com